
America private jet crash
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO
मीडिया रिपोर्टनुसार, एक खाजगी जेट टेकऑफदरम्यान कोसळले आहे. हा अपघात रविवारी स्थानिक वेळनुसार, संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान हे बॉम्बार्डियर चॅलेंजर ६०० आवृत्तीचे होते. या विमानात क्रू मेंबर्ससह ८ प्रवासी होते. अपघातानंतर त्यांना रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. परंतु अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या या अपघाताने सर्वत्र खळबळ उडालीआहे.
सध्या या अपघातामागचे कारण अस्पष्ट आहे. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की खराब हवामानामुळे हे अद्याप समजलेले नाही. बैंगोर विमानातळावर गेल्या काही दिवसापासून सतत बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे विमान धावपट्टीवरुन घसरले असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या या अपघातानंतर फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सप्रोटेशन सेफ्टी बोर्डने या घटनेची चौकशी सुरु केली आहे.
सध्या अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात बर्फ पडत आहे. गोठवणाऱ्या पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या हवामानाचा थेट हवाई वाहतूकीवरही परिणाम होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. काही उड्डाणे हवामानाचा अंदाज घेऊन सोडली जात आहेत, यामुळे विलंब होत आहे. अंतर्गत विमान वाहतूकीवरही मोठा परिणाम झाला आहे.
याच वेळी वाढत्या हिमवादळाचा धोका पाहता भारतीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने 25 आणि 26 जानेवारी रोजी आपली न्यू जर्सी मधील नेवार्कला जाणाऱ्या आणि तिकडून भारतात येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
A private jet has crashed at Bangor International Airport with 8 people onboard. The aircraft is reportedly registered to a company owned by Texas trial lawyers Jason Itkin and Kurt Arnold, financial backers of the Texans for Truth and Liberty PAC, which is active in GOP… pic.twitter.com/GBzwhEonHp — Maine State Press (@MaineStatePress) January 26, 2026
टेक्सासच्या गॅल्वेस्टनमध्ये भीषण अपघात; मेक्सिकन नौदलाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले