Pro-Palestine protesters rally against Trump administration in New York
वॉशिंग्टन: अलीकडच्या काही काळात डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेचा विषय बनत आहेत. त्यांच्या अनेक नियमांनी जागतिक स्तरावर खळबळ माजवली आहे. दरम्यान अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी (11 मार्च) ट्रम्प प्रशासनाविरोधी पॅलेस्टिनी समर्थकांनी मोठा मोर्चा काढला. हा मोर्चा प्रामुख्याने मध्य पूर्व संकट, अमेरिका विद्यापीठांमधील विद्यार्थी आंदोलन, तसेच ट्रम्प प्रशासनाच्या स्थलांतर धोरणांवरविरोधात होता. या आंदोलनात अनेक लोक सहभागी झाले, आणि पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठासाठी असलेली 400 मिलियन डॉलरची फेडरल फंडिंग रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय विद्यापीठातील कथित यहूदीविरोधी गतिविधींवर कारवाई करण्यासाठी घेण्यात आला असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले होते. तसेच, इतर विद्यापीठांच्या आर्थिक सहाय्याचीही पुनरावलोकन प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या पॅलेस्टिनी समर्थकाला अटक
या आंदोलना दरम्यान कोलंबिया विद्यापीठाच्या पदव्युत्तर विद्यार्थी महमूद खलील याला अमेरिकन स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी अटक केली. खलील याने गेल्या वर्षभरात पॅलेस्टिनी समर्थक आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. यामुळे खलील अमेरिकचा कायमस्वरुपी रहिवासी असूनही त्याला अटक करण्यात आली. त्याची पत्नी, अमेरिकन नागरिक असून सध्या आठ महिन्यांची गर्भवती आहे, तिलाही ICE कडून धमक्या मिळाल्याी माहिती समोर आली आहे.
ट्रम्प यांच्या प्रतिक्रिया
या कारवाईनंतर ट्रम्प यांनी म्हटले की, ‘ही पहिली अटक आहे, अशा अनेक घटकांमद्ये मोठी कारवाई लवकरच करण्यात येईल. कोलंबिया विद्यापीठ आणि देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये दहशतवाद समर्थक, यहूदीविरोधी आणि अमेरिका विरोधी विद्यार्थी आहेत. ट्रम्प प्रशासन याला सहन करणार नाही.’
न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात निदर्शने
या आंदोलनादरम्या निदर्शकांनी पॅलेस्टिनी झेेंडे आणि बॅनर लावले. या बॅनरवर ‘महमूद खलीलची सुटका करा’ असे लिहिले होते. एका आंदोलकांने सांगितले की, ‘हा पहिल्या दुरुस्ती अधिकाराचा (First Amendment) भंग आहे. विद्यापीठ प्रशासनाने ICE ला विद्यार्थ्यांना अटक संमती दिली असून हे अत्यंत चूकीचे आहे.’
न्यूयॉर्कमधील दोन विद्यापीठांमध्ये अध्यापन करणाऱ्या सहायक प्राध्यापक कॅथरीन विल्सन यांनी म्हटले, “विद्यापीठे बराच काळ अशा गोष्टींमध्ये सहभागी आहेत. आता हे थांबवण्याची वेळ आली आहे. या मुद्द्यावरून न्यूयॉर्कमध्ये स्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.