Protest In Los Angeles Trump warns protesters in Los Angeles on spitting on police
वॉशिंग्टन: लॉस एंजलिसमधील परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. लोक रस्तावर उतरुन मोठ्या प्रमाणात निदर्शने करत आहेत. ट्रम्प यांच्या इमिग्रेशम धोरणाविरोधात हे निदर्शन सुरु आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. अनेत गाड्या जाळल्या आहेत. याआंदोलनामुळे केंद्रीय आणि राज्यांमध्ये वाद सुरु झाला आहे.
ट्रम्प यांच्या बेकायदेशीर स्थलांतरिंतांवरील कारवाईविरोधात दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन अधिक हिंसक वळणावर येऊन पोहचले आहे. रविवारी (८ जून) झालेल्या निदर्शनांच्या रॅलीत पोलिसांवर दगडफेक आणि फटाके फेकण्यात आले. यामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान रविवारी सकाळी ट्रम्प यांनी २००० नॅशनल गार्ड तैनात केले आहे. तसेच गार्ड्सची संख्या आणखी वाढवण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
रविवारी (८ जून) ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना निदर्शकांवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, निदर्शकांनी आता वेगळा मार्ग वापरला आहे, ते पोलिसांवर थुंकत आहे. हे अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक कृत्य आहे. पोलिसांच्या तोडांवर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. सुरक्षा दलांच्या प्रतिष्ठेशी कोणीही छेडछेडा करु नये, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
यूएस इमिग्रेशन ॲंड कस्टम्स एन्फोर्समेंटने लॉस एंजेसिलमध्ये छापा टाकला. बेकायदेशीर नागरिकांना अटक करण्यात आली. यानंतर हे आंदोलन सुरु झाले. नागरिकांनी मारियाची प्लासा डाऊनटाउन एसलए मधील फेडरल डिटेन्शन सेंटपर्यंत मोर्चा काढला. तसेच आयसीईच्या विरोधात घोषणाबाजी केली.
त्यानंतर ट्रम्प यांनी लॉस एंजलिसमध्ये २००० नॅशनल गार्ड तैनात केले. नॅशनल गार्डच्या सैनिकांनी कोणतीही सुचना न देता निदर्शकांवर अश्रुधुराचा वापर केला, गोळ्या झाडल्या. यानंतर परिस्थीत आणखी बिघडली. निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास, फटाके टाकण्यास सुरुवात केली आणि अनेक गाड्या जाळल्या.
व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी निदर्शनांना बंड म्हणून संबोधले आहे. तसेच वरिष्ठ सल्लागार स्टीफन मिलर यांनी हिंस बंड म्हणून वर्ण केले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनीही काल इशारा दिला आहे की, हिंसाचार थांबला नाही तर सक्रिया दलाचे पाचारण केले जाऊ शकते. त्यांनी कॅम्प पेंडलटन येते तैनात केलेले गार्ड हाय अलर्टवर असल्याचे सांगितले आहे. सध्या परिस्थिती अधिक बिकट होत आहे.