लॉस एंजलिसमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; भडकलेल्या ट्रम्प यांनी २००० नॅशनल गार्ड केले तैनात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या आणखी एका निर्णयाने खळबळ उडाली आहे. अमेरिकेत सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात तीव्र आणि हिंसक आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनांच्या नियंत्रणासाठी ट्रम्प यांनी लॉस एंजलिसमध्ये नॅशनल गार्ड तैनात केले आहेत. या निर्णयावर स्थानिक राज्यपालांनी विरोध केला आहे.
व्हाईट हाऊसने यासंबंधी शनिवारी (७ जून) एक निवेदन जारी केली. या निवेदनात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियामध्ये, जाणूनबुजून पसरवलेली अस्थिरता संपवण्यासाठी नॅशनल गार्ड तैनात करत आहेत, असे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून अमेरिकेत स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई सुरु आहे, याला विरोध म्हणून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. या निदर्शनांना नियंत्रित करण्यासाठी ट्रम्प यांनी हा कठोर निर्णय घेतला असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. परंतु स्थानिक राज्यपांलांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचे कॅलिफोर्नियातील गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय जाणूनबुजून चिथावणी देणार आहे. या निर्णयामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
The federal government is taking over the California National Guard and deploying 2,000 soldiers in Los Angeles — not because there is a shortage of law enforcement, but because they want a spectacle.
Don’t give them one.
Never use violence. Speak out peacefully.
— Gavin Newsom (@GavinNewsom) June 8, 2025
त्यांच्या मते संघीय सरकार नॅशनल गार्डचे नियंत्रण घेण्यासाठी कारवाया करत आहे. ट्रम्प सरकारचा या चुकीच्या निर्णयामुळे तणाव वाढेल, निदर्शने वाढतील. असा इशारा गव्हर्नर न्यूसम यांनी दिला आहे. कॅलिफोर्निया नॅशनला गार्डवर नियंत्रण मिळवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे लॉस एंजलिसमध्ये २ हजार सैन्य तैनात करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा ट्रम्प प्रयत्न करत आहेत. याच वेळी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी हिसांचार सुरुच राहिला तर आणखी सैन्य तैनात करु, अशी थेट धमकी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशनच्या धोरणाविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले निदर्शन करत आहे. अनेक शहरांमध्ये एकाच वेळी हिंसक आदोंलने सुरु आहेत. निदर्शक आणि पोलिसांमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. अमेरिकेच्या लॉस एंजलिमध्येही संघीय इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ४४ लोकांना अटक केली आहे. याच्या निषेधार्थ शेकडो लोकांनी आंदोलन सुरु केली आहे. यामुळेच ट्रम्प यांनी लॉस एंजलिसमध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.