Vladimir Putin and Donald Trump
Putin on New start agreement : मॉस्को : रशिया (Russia) आणि अमेरिकेत (America) युक्रेन युद्धावरुन तणावाचे वातावरण आहे. आता यामध्ये आणखी एका करारामुळे चिंतेच भर पडली आहे. २०१० मध्ये रशिया आणि अमेरिकेत अण्वस्त्रांच्या साठ्याबाबात एक महत्त्वाचा न्यू स्टार्ट करार झाला होता. या संदर्भात रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. पुतिन यांनी रशिया या कराराचे पुन्हा पालन करेल असे म्हटले आहे.
पुतिन यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आणि रशियातील न्यू स्टार्ट कराराच्या शेवटचा शिल्लक राहिलेला अण्वस्त्र नियंत्रण कराराचे मॉस्को पुन्हा पालन करेल. या करारांतर्गत दोन्ही देशात अण्वस्त्रांच्या ठराविक मर्यादा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र २०२३ मध्ये हा करार बंद करण्यात आला. दरम्यान आता पुतिन यांनी या करारचे पालन करण्याचा संदेश देत ट्रम्प यांना खुले आव्हान केले आहे. पुतिन यांनी अमेरिकाही या कराराचे पालन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
न्यू स्टार्ट करार हा २०१० मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्या उपस्थित करण्यात आला होता. या करारानुसार, अमेरिका आणि रशिया या देशांमध्ये जास्तीत जास्त १,५५० अण्वस्त्र आणि ७०० क्षेपणास्त्रे व बॉम्ब डागण्याची वाहने तैनात करण्याची, वापरण्याची परवानगी होती. या कराराचे उद्देश दोन्ही देशात परस्पर अण्वस्त्र केंद्राचे प्रत्यक्ष निरिक्षण करणे होता. पण २०२० मध्ये या कराराचे निरिक्षण थांबले. यामुळे रशियाने २०२३ करार निलंबित करण्याचा निर्णय घेतला. रशियाने म्हटले की, अमेरिका आणि नाटोचे सहयोगी युक्रेनमध्ये रशियाच्या परभवाला प्रोत्साहन देत आहेत. यामुळे अणुस्थळांचे निरिक्षण होऊ दिले जाणार नाही. पण रशियाने स्पष्ट केले होते की, करारातील अण्वस्त्र मर्यादा पाळल्या जातील.
Russian President Vladimir Putin says Moscow will adhere to nuclear arms limits for one more year after US pact expires, reports AP. pic.twitter.com/O6TCfka02L — Press Trust of India (@PTI_News) September 22, 2025
पण आता पुतिन यांनी रशिया या कराराचे पुन्हा आणखी एक वर्ष पालन करेल अशी हमी दिली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिका देखील या कराराचे पालन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुतिन यांचे हे विधान आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवदेनशील मानले जात आहे. तसेच यामुळे नवी शस्त्रास्त्र स्पर्धा सुरु होण्याची शक्यता आहे.
सध्या रशिया युक्रेन युद्धही (Russia Ukraine War) सुरुच आहे. दोन्ही देश एकमेकांच्या नागरी भागांवर हल्ले केल्याचा आरोप करत आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रात शांततेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरु ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी युद्धविरामासाठी पुतिन यांच्यासोबत बैठकीसही सहमती दर्शवली आहे. पण रशियाच्या अटींवर मात्र युक्रेनने आक्षेप घेतला आहे. युक्रेन कोणताही तडजोड करण्यास तयार नाही. पुतिन यांनी अटींमध्ये नाटोचा पूर्वेकडील विस्तार थांबवण्याची आणि युक्रेनला नाटो सहभागी न करण्याची मागणी केली आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
काय आहे न्यू स्टार्ट करार?
अमेरिका आणि रशियामध्ये २०१० मध्ये न्यू स्टार्ट करार करण्यात आला होता. या करारांतर्गत दोन्ही देशांनी देशात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रे ठेवण्यास मनाई करण्यात आली होती.
पुतिन यांनी न्यू स्टार्ट कराराबात ट्रम्प यांना काय इशारा दिला?
अमेरिका आणि रशियामधील न्यू स्टार्ट करार २०२३ मध्ये निलंबित करण्यात आला होता, मात्र आता पुतिन यांनी अण्वस्त्र मर्यादांचे पालन करण्याची हमी डोनाल्ड ट्रम्प यांना दिली आहे.
ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीचा भारताला फायदा? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स