US Iran War : इराणचा समुद्री सापळा! होमुर्झ खाडीत खतरनाक माईन प्लॅननंतर ट्रम्प संतापले; जागतिक तेल पुरवठा धोक्यात? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
मीडिया रिपोर्टनुसार, इराणने होमुर्झच्या खाडीतून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय जहाजांना रोखण्यासाठी गुप्तपणे तयार केले सुरुंग लावले आहेत. इराणकडे सध्या माईन्स लावण्यासाठीच्या ८० ते ९० टक्के लहान बोटी आहेत. इराण संपूर्ण सागरी मार्ग ठप्प करण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्प यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
त्यांनी दावा केला आहे की, अमेरिकेच्या सैन्याने विशेष मोहिमेअंतर्गत इराणचे १६ सुरुंग पेरणार जहाजे उद्ध्वस्त केली आहे. परंतु अद्याप इराणने याची पुष्टी केलीली नाही. ट्रम्प यांनी इराण(Iran) ला इशाराही दिला आहे की, जर हे सुरुंग त्वरित हटवले नाहीत याचे इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांच्यावर असा हल्ला केला जाईल जो जगानेही कधीच पाहिला नसेल अशी ताकीद ट्रम्प यांनी दिली आहे
सध्या या तणावाचा जगातिक स्तरावर प्रचंड परिणाम होत आहे. जागतिक स्तरावर १. ५ कोटी प्रतिदीन बॅरलाचा कच्चा तेलाचा (Crude Oil) पुरवठा धोक्यात आला आहे. मध्यपूर्वेतील इराक आणि कुवैत या देशांकडे तेल निर्यातीसाठी दुसरा मार्ग नसल्याने त्यांच्या समोर उभे संकट ठोकले आहे.
युद्ध सुरु झाल्यापासून पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्चा तेलाची किंमत २४% वाढली आहे. बेंट क्रूड प्रति बॅरल १२० डॉलरवर पोहोचसले आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढण्याची भिती आहे. याशिवाय युद्धात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इराणने बहरीन, कुवैत, सौदी अरेबिया (Saudi Arabia) वर हल्ले चढवले आहेत. तसेच इराणमध्येही १,३०० हून अधिकांचा बळी गेला आहे.
Ans: Strait of Hormuz ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. जगातील सुमारे 20% कच्चे तेल या मार्गाने पाठवले जाते, त्यामुळे येथे तणाव वाढला तर जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
Ans: अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय जहाजांची हालचाल थांबवण्यावसाठी इराणने समुद्री माइन्स टाकल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
Ans: इराणने होमुर्झ खाडीची नाकाबंदी केल्याने ट्रम्प संतापले असून याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांच्यावर असा हल्ला केला जाईल जो कोणीही कधी पाहिला नसे असा इशारा दिला आहे.
Ans: Strait of Hormuz मधील तेल वाहतूक अडल्याने जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा कमी होईल. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.






