Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kilauea Volcano: ज्वालामुखीचा महाविस्फोट! 1000 फूट उंचीवर लाव्हाचे कारंजे; हवाईमध्ये 43 व्यांदा निसर्गाचे तांडव, पाहा VIDEO

US Hawaii Volcano: अमेरिकेतील हवाई येथील किलौआ ज्वालामुखीमध्ये झालेल्या शक्तिशाली उद्रेकामुळे १,००० फूट उंचीपर्यंत लावा बाहेर पडत आहे. अ‍ॅशफॉलमुळे हायवे ११ आणि जवळपासचे काही भाग तात्पुरते बंद झाले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 11, 2026 | 09:18 AM
hawaii kilauea volcano eruption 1000 feet lava ashfall highway closed marathi

hawaii kilauea volcano eruption 1000 feet lava ashfall highway closed marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • भव्य उद्रेक
  • जनजीवन विस्कळीत
  • आरोग्याला धोका

Hawaii Volcano Eruption 2026 : निसर्ग कधी आणि कोणत्या रूपाने आपले सामर्थ्य दाखवेल याचा नेम नाही. अमेरिकेतील हवाई बेटावर असलेल्या जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या ‘किलौआ’ (Kilauea Volcano) मध्ये मंगळवारी (१० मार्च २०२६) भीषण उद्रेक झाला आहे. या उद्रेकाची तीव्रता इतकी मोठी आहे की, जमिनीतून लाव्हा रसाचे लोळ तब्बल १,००० फूट उंचीपर्यंत हवेत उडत आहेत. हा थरार पाहून स्थानिक नागरिक आणि शास्त्रज्ञही थक्क झाले आहेत.

डिसेंबर २०२४ नंतरचा ४३ वा उद्रेक

हवाईच्या बिग आयलंडवर असलेल्या या ज्वालामुखीने गेल्या काही काळापासून शास्त्रज्ञांची झोप उडवली आहे. अहवालानुसार, डिसेंबर २०२४ पासून झालेला हा ४३ वा उद्रेक आहे. मंगळवारी सकाळी अचानक ज्वालामुखीचा मुखवटा उघडला आणि त्यातून लाव्हा रसाचा प्रवाह सुरू झाला. शास्त्रज्ञांच्या मते, हा उद्रेक किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे; कधी तो काही तासांत शांत होतो, तर कधी अनेक दिवस तांडव सुरू राहते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Prices: अमेरिकेचा ‘तेल पराक्रम’ की तांत्रिक गोंधळ? इराणच्या काळजात धडकी; US मंत्र्याच्या ‘त्या’ पोस्टने हाहाकार

राखेचा पाऊस आणि हायवे बंद

ज्वालामुखी केवळ लाव्हाच बाहेर टाकत नाही, तर त्यासोबत मोठ्या प्रमाणावर राख आणि काचेसारखे तीक्ष्ण कण (Tephra) हवेत पसरत आहेत. या ‘ॲशफॉल’मुळे दृष्यमानता कमी झाली असून महामार्ग ११ सह अनेक रस्ते वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आले आहेत. हवाई ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला असून पर्यटकांना तिथे जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

🚨🇺🇸#BREAKING | NEWS ⚠️
Active event Volcano Kilauea in Hawaii has erupted. Shooting lava rocks, lava and ash into the atmosphere they’re asking people to stay indoors. They have had to evacuate some people. The smoking ash has blanketed the area.
They have closed freeway 11… pic.twitter.com/1aY2Xy2sDu — Todd Paron🇺🇸🇬🇷🎧👽 (@tparon) March 10, 2026

credit – social media and Twitter

आरोग्याचा गंभीर इशारा: डोळे आणि फुफ्फुसांवर परिणाम

स्थानिक आरोग्य विभागाने नागरिकांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. ज्वालामुखीमधून बाहेर पडणारा गंधकयुक्त वायू आणि टेफ्रा कण डोळ्यांना इजा पोहोचवू शकतात. तसेच, श्वसनाद्वारे हे कण फुफ्फुसात गेल्यास गंभीर आजार होऊ शकतात. बिग आयलंडवरील अनेक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी पावसाच्या टाक्यांवर अवलंबून आहेत, या राखेमुळे त्या टाक्यांमधील पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Episode 43 of the Kilauea volcano eruption has begun in Hawaii The lava flows look exactly like wings of fire pic.twitter.com/pKdsSiF74B — Surajit (@Surajit_) March 11, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Production Top 10 Countries : जगात कोण आहे ‘ब्लॅक गोल्ड’चा किंग? ‘हे’ आहेत जगाला तेल पाजणारे टॉप 10 देश

प्रशासकीय तयारी आणि निवारा केंद्रे

हवाईचे स्थानिक अधिकारी आणि राष्ट्रीय हवामान सेवा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सुदैवाने, लाव्हाचा प्रवाह सध्या मानवी वस्तीपासून दूर असणाऱ्या विवरापुरता (Crater) मर्यादित आहे, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. ज्वालामुखीच्या हालचाली सतत बदलत असल्याने ‘हाय अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हवाईमधील ज्वालामुखीचे नाव काय आहे आणि तो किती सक्रिय आहे?

    Ans: या ज्वालामुखीचे नाव 'किलौआ' (Kilauea) असून तो जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो.

  • Que: ज्वालामुखीच्या राखेमुळे कोणते आजार होऊ शकतात?

    Ans: यामुळे डोळ्यांची जळजळ, त्वचेचे विकार आणि गंभीर श्वसनविकार (Asthma/Bronchitis) होऊ शकतात.

  • Que: हायवे ११ का बंद करण्यात आला आहे?

    Ans: ज्वालामुखीची राख आणि धुरामुळे ररस्त्यावर काहीही दिसत नसल्याने (Zero Visibility) अपघाताचा धोका टाळण्यासाठी हायवे बंद केला आहे.

Web Title: Hawaii kilauea volcano eruption 1000 feet lava ashfall highway closed marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • America
  • lava
  • Natural calamities
  • World news

संबंधित बातम्या

China Flood : चीनमध्ये पावसाचा हाहा:कार! Qinzhou शहरात ढगफुटीने विनाशकारी पूर, जनजीवन विस्कळीत
1

China Flood : चीनमध्ये पावसाचा हाहा:कार! Qinzhou शहरात ढगफुटीने विनाशकारी पूर, जनजीवन विस्कळीत

SCO बैठकीत भारताचा रुद्रावतार! दहशतवादावर पाकिस्तानला झापलं; जगाला दिला ‘हा’ संदेश
2

SCO बैठकीत भारताचा रुद्रावतार! दहशतवादावर पाकिस्तानला झापलं; जगाला दिला ‘हा’ संदेश

Pak Afghan War : पाक-अफगाण संघर्ष पुन्हा भडकला; क्षेपणास्त्र हल्ल्यात ७ नागरिकांचा बळी, शांततेचे प्रयत्न फेल?
3

Pak Afghan War : पाक-अफगाण संघर्ष पुन्हा भडकला; क्षेपणास्त्र हल्ल्यात ७ नागरिकांचा बळी, शांततेचे प्रयत्न फेल?

Russia Iran Relation : आता खेळ पलटणार! इराणसाठी Putin मैदानात; UN मध्ये थेट अमेरिकेला ललकारले
4

Russia Iran Relation : आता खेळ पलटणार! इराणसाठी Putin मैदानात; UN मध्ये थेट अमेरिकेला ललकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.