
Putin's India visit Three major agreements likely to be signed on December 5-6
Putin India visit December 2025 : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या भारत भेटीची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नसली तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते ५–६ डिसेंबरला आयोजित २३व्या वार्षिक भारत-रशिया (India-Russia) शिखर परिषदेसाठी भारतात येणार आहेत. या दौऱ्याने दोन्ही देशांमधील ऐतिहासिक, सामरिक आणि आर्थिक सहकार्याला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या परिषदेत तीन महत्त्वपूर्ण करारांवर शिक्कामोर्तब होऊ शकते, रोजगार करार, अतिरिक्त S-400 प्रणाली खरेदी आणि सुखोई-57 लढाऊ विमानांच्या सह-उत्पादनाचा ऐतिहासिक निर्णय.
भारत आणि रशिया यांच्यातील पहिला मोठा करार म्हणजे कामगार गतिशीलता करार, ज्याद्वारे रशियाच्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भारतीय कुशल कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. रशियाने आधीच जाहीर केले आहे की त्यांच्या विविध उत्पादन उद्योगांसाठी त्यांना सुमारे १० लाख भारतीय कौशल्याधारित कामगारांची आवश्यकता आहे. या करारामध्ये कामगारांचे सुरक्षित स्थलांतर, राहणीमान, वेतन आणि कायदेशीर संरक्षण यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील कौशल्यसमृद्ध कामगारांना जागतिक दर्जाच्या रोजगार संधी उपलब्ध करून देणारा हा इतिहासातील सर्वात मोठा द्विपक्षीय रोजगार करार ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : FACT CHECK : अखेर समोर आले किंग खान आणि PM मोदींच्या VIRAL ‘जिहाद’ व्हिडिओमागचे तथ्य; वाचा नक्की काय आहे सत्य?
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेसाठी अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या S-400 एअर डिफेन्स प्रणालीचे खरेदी निर्णय. भारताने रशियाकडून आधीच पाच प्रणालींची ऑर्डर दिली असून तीन प्रणाली भारताला मिळाल्या आहेत. उर्वरित दोन प्रणाली वितरित होणे बाकी आहेत. दरम्यान, भारत आता आणखी पाच अतिरिक्त S-400 प्रणाली खरेदी करण्यास इच्छुक आहे. अलीकडच्या “ऑपरेशन सिंदूर”दरम्यान S-400 रडारने शत्रूंच्या धोक्यांना वेळेत ओळखून त्यांना रोखण्याची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे या प्रणालीची गरज आणखी वाढली आहे. पुतिन यांच्या भेटीदरम्यान या करारावर महत्त्वपूर्ण प्रगती होण्याची दाट शक्यता आहे.
तिसरा आणि सर्वाधिक धोरणात्मक करार म्हणजे सुखोई-57 (Su-57) या 5व्या पिढीच्या लढाऊ विमानांचे सह-उत्पादन. भारतीय हवाई दलाला आधुनिक तंत्रज्ञानयुक्त, स्टेल्थ क्षमतांसह 114 लढाऊ विमानांची गरज आहे. सु-५७ ही ही गरज पूर्ण करणारी जगातील अत्याधुनिक विमान प्रणाली मानली जाते. भारत “मेक इन इंडिया” उपक्रमाअंतर्गत या विमानांचे सह-उत्पादन भारतात करण्याच्या दिशेने मोठा निर्णय घेऊ शकतो. या करारामुळे भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राला नवी चालना मिळणार असून, स्वदेशी संरक्षण क्षमतेत ऐतिहासिक वाढ होण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Radar Proof : युद्धाच्या पार्शवभूमीवर ड्रॅगनचा आश्चर्यकारक दावा; लुफा तंत्रज्ञानामुळे गुप्तचर विमान होऊ शकते पूर्णपणे ‘अदृश्य’
याशिवाय पुतिन यांच्या भेटीदरम्यान ऊर्जा, अणुउर्जा, हवामान बदल, नवीकरणीय ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये नवे करार किंवा पूर्वीचे करार नूतनीकरण होऊ शकते. भारताने अलीकडेच अमेरिकेच्या निर्बंधांना टाळण्यासाठी रशियाकडून तेल खरेदीत काही प्रमाणात कपात केली असली तरी, दोन्ही देशांमधील संबंध संतुलित आणि परस्पर हिताचे असल्याचे या दौऱ्यातून पुन्हा अधोरेखित होणार आहे. एकूणच, पुतिन यांचा हा दौरा भारत-रशिया संबंधांना नवी दिशा देणार असून, रोजगार, संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्य या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांत मोठे बदल घडवू शकतो.
Ans: ५–६ डिसेंबर रोजी त्यांच्या भेटीची शक्यता आहे.
Ans: रोजगार करार, अतिरिक्त S-400 प्रणाली आणि Su-57 लढाऊ विमानांच्या सह-उत्पादनाचा निर्णय.
Ans: रशिया अंदाजे १० लाख कुशल भारतीय कामगारांची भरती करणार आहे.