
Putin's Lady Brigade These are the 10 powerful women who shape the political power of Russia and the world
Putins Lady Brigade : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे केवळ सामर्थ्यवान नेते नसून, ते अत्यंत काटेकोर नियोजन करणारे आणि विश्वासू सल्लागारांवर भर देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भोवती असलेली तथाकथित “लेडी ब्रिगेड” (Lady Brigade) ही केवळ नावापुरती टीम नसून, रशियाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि जागतिक धोरणांवर प्रत्यक्ष प्रभाव टाकणारी शक्ती मानली जाते. पुतिन यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर ही टीम पुन्हा एकदा माध्यमांच्या केंद्रस्थानी आली असून, तिच्या भूमिकेबाबत जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
व्हॅलेंटिना मॅटवियेन्को :
त्या रशियन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षा आहेत आणि रशियन राजकारणात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना पुतिन यांचे सर्वात विश्वासू सहाय्यक आणि संभाव्य उत्तराधिकारी मानले जाते.
मारिया झाखारोवा :
रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या. त्या एक सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत, जागतिक मुद्द्यांवर रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेचे जोरदार प्रतिनिधित्व करतात आणि पुतिन यांच्या जवळच्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Politics: पाकिस्तानात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे; PM शरीफांनी राजकारणाचा फास मुनीरभोवती घट्ट आवळला
अलिना काबाएवा :
जिम्नॅस्टिक्समध्ये ऑलिंपिक विजेती. ती पुतिन यांची सर्वात जवळची सहाय्यक आणि प्रेयसी असल्याचे म्हटले जाते. ती सध्या रशियाच्या राष्ट्रीय मीडिया ग्रुपची अध्यक्ष आहे.
कॅटेरिना तिखोनोवा आणि मारिया व्होरोंत्सोवा :
दोघीही पुतिन यांच्या मुली असल्याचे सांगितले जाते. कॅटेरिना एका कंपनीच्या मालक आहेत, तर मारिया एक प्रसिद्ध रशियन शास्त्रज्ञ आहेत.
अण्णा त्सिव्हिल्योवा :
त्या पुतिन यांच्या नातेवाईक आहेत आणि गेल्या वर्षी त्यांनी रशियाच्या उपसंरक्षण मंत्री म्हणून काम केले आहे, संरक्षण बाबींमध्ये त्यांचा प्रभाव आहे.
एल्बिरा नाबिउलिना :
रशियाच्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नर. तिने पुतिन यांच्या आर्थिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे आणि रशियाच्या आर्थिक स्थिरतेत ती महत्त्वाची भूमिका बजावते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SSB Alert : India-Nepal सीमेवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; घुसखोरांना रोखण्यासाठी दोन्ही देशाने घेतला ‘हा’ कठोर निर्णय
तात्याना गोलिकोवा :
रशियाच्या उपपंतप्रधान.
ओल्गा गोलोडेट्स :
माजी उपपंतप्रधान.
व्हॅलेंटिना तेरेशकोवा :
पुतिन यांच्या पक्षाच्या संसद सदस्या आणि पहिल्या महिला अंतराळवीर.
Ans: रशियाच्या राजकारण, संरक्षण, अर्थव्यवस्था आणि कूटनीतीवर प्रभाव टाकणाऱ्या १० प्रमुख महिलांचा एक शक्तिशाली गट म्हणजे ‘पुतिनची लेडी ब्रिगेड’
Ans: होय, प्रशासन, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक निर्णयांमध्ये त्यांचा सल्ला महत्त्वाचा मानला जातो.
Ans: पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या टीमच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा वाढली आहे.