Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Qatar Visa: इराण युद्धात पुढारी बनणाऱ्या पाकिस्तानसाठी कतारने ‘असे’ बंद केले दरवाजे; भारतीयांना मात्र ‘रेड कार्पेट’ ट्रीटमेंट

India Qatar Relations : कतारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा तात्पुरती स्थगित केली आहे, परंतु भारतासोबतच्या घनिष्ठ संबंधांमुळे भारतीय प्रवाशांना ही सुविधा देणे सुरू ठेवणार आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 02, 2026 | 12:33 PM
qatar suspends visa on arrival for pakistan indians continue to get free entry 2026

qatar suspends visa on arrival for pakistan indians continue to get free entry 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानची जागतिक नाचक्की
  • भारताचा दबदबा कायम
  • सुरक्षेचे कारण अन् इराण युद्ध

Qatar Visa on Arrival for Pakistanis suspended 2026 : जागतिक राजकारणात सध्या अशा काही घडामोडी घडत आहेत, ज्याने पाकिस्तानच्या (Pakistan) ‘इस्लामिक लीडरशिप’च्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. एकीकडे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्धाचा वणवा पेटलेला असताना, पाकिस्तान स्वतःला या संघर्षात मध्यस्थ आणि मुस्लिम देशांचा मोठा भाऊ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पाकिस्तानच्या या प्रयत्नांना कतारने असा काही सुरुंग लावला आहे की, संपूर्ण इस्लामाबाद हादरून गेले आहे. कतारने (Qatar) पाकिस्तानी नागरिकांसाठी मिळणारी ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’ (VOA) सुविधा तात्पुरती स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानसाठी दरवाजे बंद, व्हिसा नियम कडक!

कतारमधील पाकिस्तानी दूतावासाने ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी अधिकृत घोषणा केली की, आता पाकिस्तानी नागरिकांना कतारमध्ये उतरल्यावर व्हिसा मिळणार नाही. या निर्णयामुळे हजारो पाकिस्तानी पर्यटकांची आणि नोकरीसाठी जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. आता कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला कतारमध्ये प्रवेश करायचा असल्यास, त्यांना प्रवासापूर्वीच ‘हय्या पोर्टल’ (Hayya Portal) द्वारे ऑनलाइन अर्ज करून व्हिसा मिळवणे अनिवार्य असेल. जर कोणीही वैध व्हिसाशिवाय कतारच्या विमानतळावर उतरले, तर त्यांना तिथल्या तिथे ‘हद्दपार’ (Deport) केले जाईल, असा सज्जड दमही देण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Strategy : असे थांबले युद्ध! अमेरिका-इराण युद्धाच्या अर्धवट समाप्तीमागे दडली आहेत ‘ही’ अब्जावधींचे 5 गुपिते, वाचा सविस्तर

भारताची ताकद: कतारकडून भारतीयांचे भव्य स्वागत!

पाकिस्तानसाठी कडक निर्बंध लादले जात असताना, भारतासाठी मात्र कतारने आपले दरवाजे अधिक रुंदावले आहेत. भारत आणि कतार यांच्यातील ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंधांमुळे, भारतीय नागरिकांना ३० दिवसांचा ‘मोफत’ व्हिसा-ऑन-अरायव्हल मिळत राहील. इतकेच नाही तर, २८ फेब्रुवारी २०२६ पासून कतारने भारतीय प्रवाशांच्या व्हिसा मुदतीत ३० दिवसांची आपोआप वाढ करण्याची सुविधाही दिली आहे. हे स्पष्टपणे दर्शवते की, जागतिक स्तरावर कतार कोणाला आपला खरा मित्र मानतो. भारतीय पासपोर्ट धारकांना केवळ हॉटेल बुकिंग, आरोग्य विमा आणि वैध पासपोर्टच्या आधारे कतारमध्ये राजाश्रय मिळत आहे.

🌍✨Doha joins the global movement for #EarthHour2026! 🇶🇦 Watch the Doha skyline switch off its lights on 28 March 2026, in a display of support for our planet. Qatar l Doha l Earth Hour 2026 l 60 Earth Hour pic.twitter.com/TiNowSY2es — ILoveQatar – Live (@ILQLive) March 28, 2026

credit – social media and Twitter

पाकिस्तानच्या ‘नेतृत्वाला’ घरचा आहेर!

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि तिथले लष्कर सतत इराण-अमेरिका वादात मध्यस्थी करण्याच्या गप्पा मारत आहेत. मात्र, कतारला पाकिस्तानच्या या भूमिकेवर विश्वास नाही. मध्य-पूर्वेतील वाढता तणाव पाहता, कतारने आपल्या सीमा अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानमधून येणाऱ्या प्रवाशांकडून सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो किंवा तिथे ‘मानवी तस्करी’ आणि ‘गुन्हेगारी’ वाढू शकते, या भीतीपोटी कतारने हा निर्णय घेतला आहे. मुस्लिम ब्रदरहूड आणि इतर इस्लामी संघटनांच्या नावाखाली पाकिस्तान जे राजकारण करत आहे, त्याला कतारने दिलेला हा थेट नकार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: मुज्तबा खामेनींच्या ‘त्या’ 5 निर्णयांनी महासत्तेचे गर्व हरण; अमेरिकेने युद्धात टेकले गुडघे आणि होर्मुझमधूनही माघार

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना: काय काळजी घ्याल?

जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि कतारला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्याकडे किमान सहा महिने वैध असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे. यासोबतच आरोग्य विमा (Health Insurance) आणि परतीचे तिकीट असणे अनिवार्य आहे. मात्र, पाकिस्तानी प्रवाशांसाठी आता परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यांना कतारच्या गृह मंत्रालयाकडून अधिकृत परवानगी मिळाल्याशिवाय विमानतळावर पाऊलही ठेवता येणार नाही. सुरक्षेच्या या नवीन नियमांमुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कतारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा का बंद केली?

    Ans: मध्य-पूर्वेतील वाढता तणाव आणि सुरक्षेच्या कारणास्तव कतारने हा निर्णय घेतला असून, आता पाकिस्तानी नागरिकांना 'हय्या पोर्टल'द्वारे आधीच व्हिसा घेणे अनिवार्य आहे.

  • Que: भारतीय नागरिकांना कतारमध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हल मिळणार का?

    Ans: होय, भारत आणि कतारच्या मजबूत संबंधांमुळे भारतीय नागरिकांना ३० दिवसांचा मोफत व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

  • Que: कतारला जाण्यासाठी पासपोर्टची वैधता किती असावी लागते?

    Ans: कतारला प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाकडे प्रवासाच्या तारखेपासून किमान ६ महिने वैध असलेला पासपोर्ट असणे अनिवार्य आहे.

Web Title: Qatar suspends visa on arrival for pakistan indians continue to get free entry 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Qatar
  • Visa Rule
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Relation : ‘आम्ही तुमचे शत्रू नाही…’ ; इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे अमेरिकेला खुले पत्र
1

US Iran Relation : ‘आम्ही तुमचे शत्रू नाही…’ ; इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे अमेरिकेला खुले पत्र

‘नेतन्याहू माझ्यामुळेच जिवंत…!’ ट्रम्प यांचे इस्रायलच्या अस्तित्त्वार मोठे विधान; माजी अध्यक्ष ओबामांवर साधला निशाणा
2

‘नेतन्याहू माझ्यामुळेच जिवंत…!’ ट्रम्प यांचे इस्रायलच्या अस्तित्त्वार मोठे विधान; माजी अध्यक्ष ओबामांवर साधला निशाणा

नेपाळ पर्यटनाला पश्चिम आशियाई संघर्षाचा फटका; पाश्चात्य पर्यटकांची घट, तर भारत ठरला ‘संकटमोचक’
3

नेपाळ पर्यटनाला पश्चिम आशियाई संघर्षाचा फटका; पाश्चात्य पर्यटकांची घट, तर भारत ठरला ‘संकटमोचक’

US Iran War : इराणशी युद्धात अमेरिकेचा दणदणीत विजय? राष्ट्राला संबोधित करताना ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
4

US Iran War : इराणशी युद्धात अमेरिकेचा दणदणीत विजय? राष्ट्राला संबोधित करताना ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.