Rafale Controversy : राफेल करारात मोठा पेच! रशियाच्या भितीने भारताला सोर्स कोड देण्यास फ्रान्सचा नकार? युक्रेनच्या दाव्याने खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारत आणि फ्रान्समध्ये ११४ राफेल लढाऊ विमानंच्या खरेदीचा ३५-४० अब्ज डॉलरचा करार झाला आहे. हा करार सध्या सोर्सकोडच्या मुद्यामुळे अडकून पडला आहे. भारत आपल्या विमानांच्या सॉफ्टेवेअरवर पूर्ण नियंत्रण आणि स्वतंत्रपणे मुभा मागत आहे. मात्र फ्रान्स तांत्रिक सुरक्षेचा हवाला देत सोर्स कोड देण्यास नकार दिला आहे. यामाग रशिया हेच कारण असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सांगितले जात आहे.
भारत आणि रशिया(Russia) चे संबंध गेल्या अनेक काळापासून आहेत. शिवाय गेल्या काही काळात दोन्ही देशांतील संबंधात अधिक मैत्री झाली आहे. रशियासोबत भारताची संरक्षण भागीदारीही वाढत आहे. या वाढत्या भागीदारीमुळे फ्रान्सला राफेलचे तंत्रज्ञान रशियापर्यंत पोहोचण्याची भीती आहे. यामुळे जागतिक सुरक्षा धोक्यांमुळे फ्रान्स सावधगिरीने पाऊल उचलत आहे. सध्या यावर भारत आणि फ्रान्समध्ये चर्चा सुरु आहे.
भारत लवकरच ४० अब्ज डॉलर्स खर्चून ११४ राफेल विमानांची खरेदी करणार आहे. यामध्ये २४ प्रगत F5 मॉडेलचाही समावेश आहे. या करारासाठी भारत १०० टक्के किंमत मोजणार आहे. या किंमतीमध्ये अर्धा वाटा हा सोर्स कोडचा असतो. सोर्स कोड हे विमानाचे सॉफ्टवेअर ब्रेन असते. याच्या मदतीने राफेलचे रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि क्षेपणास्त्र प्रणालीवर नियंत्रण ठेवता येते.
हा सोर्स कोड मिळाल्यास यामुळे विमानांमध्ये साधे बदल करण्यासाठी किंवा शस्त्रास्त्रे जोडण्यासाठी भारताला सतत फ्रान्सची गरज भासणार नाही. ज्यामुळे भारताच्या आत्मनिर्भर भारत या मोहिमेला चालना मिळेल. परंतु सोर्स कोड देण्यास फ्रान्सने नकार दिल्याने हा करार लांबणीस पडला आहे.






