Rafale Controversy : राफेल डीलवरुन फ्रान्सची कोंडी! UAE ने प्रकल्पातून घेतली माघार, भारताची काय असेल रणनीती? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बाप रे! T Rex डायनासोरच्या अवशेषांपासून शास्त्रज्ञांनी बनवली लेदर बॅग; किंमत ऐकून व्हाल थक्क
मिळालेल्या माहितीनुसार, यूएई या प्रकल्पात सुमारे ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूत करणार होता. या बदल्यात UAE ने फ्रान्सकडे राफेल F5 चा सोर्स कोड आणि ‘ऑप्ट्रॉनिक्स’ तंत्रज्ञानाची मागणी केली होती. परंतु फ्रान्सने आपल्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या संवेदनशील तंत्रज्ञानाची माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळे यूएईने या प्रकल्पातून माघार घेतली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे या प्रकल्पाचा संपूर्ण खर्चाचा भार एकट्या फ्रान्सवर येऊन पडला आहे. परिणामी विमानांच्या वितरणास विलंब होण्याची शक्यता आहे.
Rafale Source Code Issue Access to the full source code is not the same as possessing the full source code. Full access can be provided through a layer of abstraction without transferring the underlying code. When working through such an abstraction layer, the user cannot know… https://t.co/ZSe8jb7Ixo — Vijainder K Thakur (@vkthakur) April 3, 2026
भारत लवकरच ४० अब्ज डॉलर्स खर्चून ११४ राफेल विमानांची खरेदी करणार आहे. यामध्ये २४ प्रगत F5 मॉडेलचाही समावेश आहे. या करारासाठी भारत १०० टक्के किंमत मोजणार आहे, परंतु सोर्स कोडशिवाय विमानाचे नियंत्रणही पूर्णपणे भारताकडे नसेल.
सोर्सकोडचे महत्त्व – आधुनिक विमानांच्या किमतीत ३० ते ४० टक्के वाटा हा सोर्स कोडचा असतो. हा कोड न मिळाल्यास भविष्यात विमानांमध्ये साधे बदल करण्यासाठी किंवा शस्त्रास्त्रे जोडण्यासाठी भारताला फ्रान्सवर अवलंबून रहावे लागले. फ्रान्सने १८ विमाने तयार स्थितीत देऊन इर्वरित ९६ भारतात तयारी केली जाणार आहे. परंतु महत्त्वाच्या रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टमचे सोर्स कोड देण्यास नकार दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, या करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सोर्स कोडच्या उपलब्धतेत फ्रान्सकडून ठोस हमी घेणे आवश्यक आहे. यूएई आणि भारताची परिस्थिती वेगळी आहे, परंतु तंत्रज्ञानावर संपूर्ण नियंत्रणाशिवाय अब्जावधींची गुंतवणूक भारतासाठी महागडी ठरु शकते. भविष्यात फ्रान्सवर अवलंबून राहणे भारतासाठी चिंतेचे कारण ठरु शकते.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, UAE ला प्रकल्पात गुंतवणूक करूनही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि सोर्स कोड मिळत नव्हता. फ्रान्स ने संवेदनशील तंत्रज्ञान देण्यास नकार दिल्यामुळे UAE ने यातून माघार घेतली.
Ans: तज्ज्ञांच्या मते, भारताने डील रद्द करण्याची शक्यता कमी आहे. परंतु भविष्यात आवश्यकतेनुसार, सोर्स कोड किंवा तांत्रिक प्रवेश मिळेल याची फ्रान्सकडून हमी घेणेही महत्त्वाचे आहे.






