Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rafale Controversy : राफेल डीलवरुन फ्रान्सची कोंडी! UAE ने प्रकल्पातून घेतली माघार, भारताची काय असेल रणनीती?

Rafale F5 Fighter Jet Controversy : फ्रान्स राफेलच्या प्रकल्पावरुन मोठे संकटात सापडला आहे. राफेल F5 मॉडेलच्या प्रकल्पातून युएईने माघार घेतली आहे. तर भारताची हीच रणनीती असण्याची शक्यता आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 04, 2026 | 07:20 PM
Rafael Controversy

Rafael Controversy

Follow Us
Close
Follow Us:
  • राफेल डीलवरुन फ्रान्सची कोंडी
  • UAE ने प्रकल्पातून घेतली माघार
  • भारताची काय असेल रणनीती?
एक मोठे वृत्त समोर आले आहे. फ्रान्स(France) चा महत्त्वाकांक्षी राफेल F5 प्रकल्प मोठ्या संकटात सापडला आहे. संयुक्त अरब अमिरातीने या प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे फ्रान्सच्या संरक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम भारताच्या आगामी ११४ राफेल विमानांच्या खरेदीवर होऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊ.

बाप रे! T Rex डायनासोरच्या अवशेषांपासून शास्त्रज्ञांनी बनवली लेदर बॅग; किंमत ऐकून व्हाल थक्क

संयुक्त अरब आणि फ्रान्समधील वाद

मिळालेल्या माहितीनुसार, यूएई या प्रकल्पात सुमारे ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूत करणार होता. या बदल्यात UAE ने फ्रान्सकडे राफेल F5 चा सोर्स कोड आणि ‘ऑप्ट्रॉनिक्स’ तंत्रज्ञानाची मागणी केली होती. परंतु फ्रान्सने आपल्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या संवेदनशील तंत्रज्ञानाची माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळे यूएईने या प्रकल्पातून माघार घेतली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे या प्रकल्पाचा संपूर्ण खर्चाचा भार एकट्या फ्रान्सवर येऊन पडला आहे. परिणामी विमानांच्या वितरणास विलंब होण्याची शक्यता आहे.

Rafale Source Code Issue Access to the full source code is not the same as possessing the full source code. Full access can be provided through a layer of abstraction without transferring the underlying code. When working through such an abstraction layer, the user cannot know… https://t.co/ZSe8jb7Ixo — Vijainder K Thakur (@vkthakur) April 3, 2026

भारतासाठी धोक्याची घंटा

भारत लवकरच ४० अब्ज डॉलर्स खर्चून ११४ राफेल विमानांची खरेदी करणार आहे. यामध्ये २४ प्रगत F5 मॉडेलचाही समावेश आहे. या करारासाठी भारत १०० टक्के किंमत मोजणार आहे, परंतु सोर्स कोडशिवाय विमानाचे नियंत्रणही पूर्णपणे भारताकडे नसेल.

सोर्सकोडचे महत्त्व – आधुनिक विमानांच्या किमतीत ३० ते ४० टक्के वाटा हा सोर्स कोडचा असतो. हा कोड न मिळाल्यास भविष्यात विमानांमध्ये साधे बदल करण्यासाठी किंवा शस्त्रास्त्रे जोडण्यासाठी भारताला फ्रान्सवर अवलंबून रहावे लागले. फ्रान्सने १८ विमाने तयार स्थितीत देऊन इर्वरित ९६ भारतात तयारी केली जाणार आहे. परंतु महत्त्वाच्या रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टमचे सोर्स कोड देण्यास नकार दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते, या करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सोर्स कोडच्या उपलब्धतेत फ्रान्सकडून ठोस हमी घेणे आवश्यक आहे. यूएई आणि भारताची परिस्थिती वेगळी आहे, परंतु तंत्रज्ञानावर संपूर्ण नियंत्रणाशिवाय अब्जावधींची गुंतवणूक भारतासाठी महागडी ठरु शकते. भविष्यात फ्रान्सवर अवलंबून राहणे भारतासाठी चिंतेचे कारण ठरु शकते.

Hormuz Crisis : होर्मुझ वाचवण्यासाठी आता युक्रेन मैदानात? झेलेन्स्कींनी मांडला सीक्रेट प्लॅन, जगात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्रान्ससोबतच्या राफेल F5 प्रकल्पातून UAE का बाहेर पडले?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, UAE ला प्रकल्पात गुंतवणूक करूनही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि सोर्स कोड मिळत नव्हता. फ्रान्स ने संवेदनशील तंत्रज्ञान देण्यास नकार दिल्यामुळे UAE ने यातून माघार घेतली.

  • Que: भारताचा राफेल डीलबाबत निर्णय बदलेल का?

    Ans: तज्ज्ञांच्या मते, भारताने डील रद्द करण्याची शक्यता कमी आहे. परंतु भविष्यात आवश्यकतेनुसार, सोर्स कोड किंवा तांत्रिक प्रवेश मिळेल याची फ्रान्सकडून हमी घेणेही महत्त्वाचे आहे.

Web Title: Rafale controversy france under pressure uae withdraws india strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Dassault Rafale
  • France
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

CAP Pakistan : पाकिस्तानने केली भारताची नक्कल? बनवली ‘कॉकरोच अवामी पार्टी’ ; पण एका चुकीमुळे उडाली खिल्ली
1

CAP Pakistan : पाकिस्तानने केली भारताची नक्कल? बनवली ‘कॉकरोच अवामी पार्टी’ ; पण एका चुकीमुळे उडाली खिल्ली

Rubio India Visit : भारताला इंधन पुरवठा करणार अमेरिका? परराष्ट्र मंत्री रुबियो यांच्या दौऱ्यात होणार मोठा करार?
2

Rubio India Visit : भारताला इंधन पुरवठा करणार अमेरिका? परराष्ट्र मंत्री रुबियो यांच्या दौऱ्यात होणार मोठा करार?

Trump Jr Wedding : ‘मी गेलो तरी मारला जाईन, नाही गेलो तरी…’ ट्रम्प यांनी आपल्याच मुलाच्या लग्नाबद्दल का म्हटले असे?
3

Trump Jr Wedding : ‘मी गेलो तरी मारला जाईन, नाही गेलो तरी…’ ट्रम्प यांनी आपल्याच मुलाच्या लग्नाबद्दल का म्हटले असे?

Golden Dome : इस्रायलच्या आयर्न डोमपेक्षाही खतरनाक! अमेरिका आता अंतराळात तैनात करणार घातक शस्त्र, रशिया-चीनचा उडाला थरकाप
4

Golden Dome : इस्रायलच्या आयर्न डोमपेक्षाही खतरनाक! अमेरिका आता अंतराळात तैनात करणार घातक शस्त्र, रशिया-चीनचा उडाला थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.