Rini Sampath: तामिळनाडूची लेक अमेरिकेत गाजवणार मैदान! रिनी संपत महापौरपदाच्या शर्यतीत; लोकांच्या नजरा खिळल्या निवडणुकीवर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Rini Sampath Washington DC Mayor candidate : अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाच्या व्यक्तींचा बोलबाला सातत्याने वाढत आहे. आता या यादीत आणखी एक मानाचे नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे रिनी संपत (Rini Sampath). अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसी (Washington D.C.) मध्ये सध्या महापौरपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि या निवडणुकीत रिनी संपत यांनी आपली उमेदवारी जाहीर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या एका मुलीने आज जगातील सर्वात शक्तिशाली शहराच्या सर्वोच्च पदासाठी दावा ठोकला आहे, ही बाब संपूर्ण भारतासाठी गौरवास्पद आहे.
रिनी संपत यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या रिनी अवघ्या ७ वर्षांच्या असताना आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. गेल्या १० वर्षांहून अधिक काळ त्या वॉशिंग्टन डीसीमध्ये वास्तव्यास आहेत. ३१ वर्षांच्या रिनी यांनी एक ‘सरकारी कंत्राटदार’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र, केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने राजकारणात पाऊल ठेवले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या रिनी यांच्याकडे तरुण आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bahrain Bapco: इराणने बहरीनमध्ये घातला धुमाकूळ! ‘घातक’ हल्ल्यामुळे तेल उत्पादन ठप्प, कुवेतमध्ये अंधार; पाहा धक्कादायक VIDEO
रिनी संपत यांनी आपल्या प्रचाराची धुरा अत्यंत साध्या पण प्रभावी मुद्द्यांवर ठेवली आहे. त्यांनी ‘फिक्स द बेसिक्स’ (Fix the Basics) ही संकल्पना मांडली आहे. आपल्या वेबसाइटवर त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “मी प्रस्थापित राजकारणी नाही आणि कोणत्याही मोठ्या हितसंबंधी गटाच्या दबावाखाली नाही. आता वेळ आली आहे की एका सामान्य व्यक्तीने पुढे येऊन शहराच्या मूलभूत सोयीसुविधांकडे लक्ष द्यावे.” रस्ते, पाणी आणि सुरक्षा यांसारख्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला आहे.
Rini Sampath, a Tamil Nadu-born candidate, has become the first South Asian person to secure a place on the ballot of Washington DC’s Mayoral elections.https://t.co/uICJHx40Qj — Firstpost (@firstpost) April 4, 2026
credit – social media and Twitter
रिनी संपत यांच्या विजयाचा मार्ग हा ‘लोकशक्ती’ (People Power) वर आधारित आहे. केवळ चार आठवड्यांच्या मोहिमेत त्यांनी मतपत्रिकेवर आपले नाव आणून दाखवले, जे यापूर्वी कोणत्याही दक्षिण आशियाई उमेदवाराला जमले नव्हते. त्यांच्या योजनेत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Pilot Rescue : इराणच्या जबड्यातून वैमानिकाची सुटका! अमेरिकेचा थरारक ‘रेस्क्यू मिशन’; ट्रम्प यांचा शत्रूला सज्जड दम
वॉशिंग्टन डीसी हा १९७५ पासून डेमोक्रॅटिक पक्षाचा अभेद्य गड राहिला आहे. आजवर इथे कोणताही रिपब्लिकन महापौर निवडून आलेला नाही. अशा परिस्थितीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत रिनी संपत यांनी मारलेली मजल अत्यंत महत्त्वाची आहे. जर रिनी ही निवडणूक जिंकल्या, तर त्या वॉशिंग्टन डीसीच्या पहिल्या दक्षिण आशियाई महापौर बनून इतिहास रचतील. तामिळनाडूच्या या कन्येचा विजय हा केवळ त्यांचा वैयक्तिक विजय नसून, तो अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या वाढत्या प्रभावाचा पुरावा असेल.
Ans: रिनी संपत या भारतीय वंशाच्या (तामिळनाडू) महिला असून त्या अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी शहराच्या महापौरपदासाठी निवडणूक लढवत आहेत.
Ans: रिनी यांच्या प्रचाराचे मुख्य सूत्र 'फिक्स द बेसिक्स' (मूलभूत गोष्टी सुधारा) हे असून त्या शहराच्या पायाभूत सुविधांवर भर देत आहेत.
Ans: वॉशिंग्टन डीसीच्या इतिहासात महापौरपदाच्या प्राथमिक मतपत्रिकेवर नाव येणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई उमेदवार ठरल्या आहेत.






