Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Riyadh Airport Attack : रियाध विमानतळावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, 12 ठार व 300 जखमी; भारताकडून तीव्र निषेध

Riyadh Airport Attack : सौदी अरेबियाच्या रियाध विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक जण जखमी झाले. सौदी आघाडीने हौथींना यासाठी जबाबदार धरले आहे. ट्रम्प यांनी लष्करी कारवाईत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 11, 2026 | 02:47 PM
Riyadh airport missile attack King Khalid International Airport Riyadh

Riyadh airport missile attack King Khalid International Airport Riyadh

Follow Us
Follow Us:
  • रियाध विमानतळावर भीषण हल्ला
  • आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि भारताची प्रतिक्रिया
  • अमेरिकेची लष्करी हस्तक्षेपाची शक्यता

आखाती देशांमधील भू-राजकीय तणाव आता अत्यंत टोकाला पोहोचला आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर’ (Riyadh Airport Attack ) शनिवारी एक भीषण क्षेपणास्त्र हल्ला झाला. या अत्यंत प्राणघातक हल्ल्यात १२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांत कोणत्याही आखाती अरब देशावर झालेला हा सर्वात मोठा आणि विनाशकारी हल्ला मानला जात आहे.

आखातात युद्धाचे ढग दाटले

सौदी अरेबियाच्या हवाई वाहतूक आणि सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यासाठी येमेनच्या हुथी (Houthi) बंडखोरांना थेट जबाबदार धरले आहे. या हुथी बंडखोरांना इराणचा गुप्त आणि प्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे मानले जाते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या क्षेपणास्त्राने विमानतळाच्या टर्मिनल ३ आणि ४ वर अचूक निशाने साधले, जिथून प्रामुख्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा हाताळली जाते. विशेष म्हणजे, या विमानतळावर कोणताही अधिकृत लष्करी तळ नसताना थेट नागरिकांच्या रहदारीच्या आणि सोयीच्या ठिकाणांवर हा हल्ला करण्यात आला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood : नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय! बुढी गंडकी नदीच्या प्रवाहात घरे अन् पूल वाहून गेले; नागरिकांना हायअलर्ट, VIDEO VIRAL

विविध देशांच्या नागरिकांचा मृत्यू आणि जागतिक खळबळ

या भीषण हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये केवळ सौदी नागरिकच नाहीत, तर विविध देशांचे नागरिक सामील आहेत. मृतांमध्ये ४ सौदी नागरिक, २ बांगलादेशी नागरिक आणि अमेरिका, पॅलेस्टाईन, इजिप्त, जॉर्डन, सीरिया व सुदान या देशांच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. यावरून हा हल्ला किती व्यापक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम करणारा होता याची प्रचिती येते. जखमींवर रियाधमधील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये आपत्कालीन उपचार सुरू आहेत.

MASS CASUALTIES IN RIYADH The damage from the attack on Riyadh’s King Khalid International Airport is extensive. Saudi authorities now report 12 people killed and 309 injured after the airport was struck. The Saudi-led coalition blames the Iran-backed Houthis for the attack. Airport operations were suspended as authorities assessed the damage. — Mossad Commentary (@MOSSADil) October 11, 2026

credit – social media and Twitter

हल्ल्यानंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे तातडीने थांबवण्यात आली. संपूर्ण परिसराची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून मोठ्या संख्येने पोलीस आणि लष्करी पथके तैनात करण्यात आली आहेत. फ्लाइटराडार२४ च्या आकडेवारीनुसार, आकाशात घिरट्या घालणारी अनेक विमाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून इतर जवळच्या विमानतळांकडे वळवण्यात आली. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासह अनेक प्रमुख देशांनी आपल्या नागरिकांसाठी तातडीची ॲडव्हायझरी जारी करून रियाध विमानतळाच्या परिसरात जाणे टाळण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा कडक इशारा आणि अमेरिकेची भूमिका

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संकेत दिले की, अमेरिका हुथी बंडखोरांविरुद्धच्या सौदी अरेबियाच्या लष्करी कारवाईत सक्रिय सहभाग घेण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. ट्रम्प म्हणाले, “आम्ही देखील यामध्ये प्रत्युत्तर देऊ शकतो. आम्हाला नुकतीच या हल्ल्याची सविस्तर माहिती मिळाली आहे, आणि आम्ही लवकरच यावर अंतिम निर्णय घेऊ.”

सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्करी युती या हल्ल्याला ‘युद्धगुन्हा’ (War Crime) म्हटले असून याचे योग्य वेळी चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, या ताज्या हल्ल्यावर हुथी बंडखोरांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र यामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : British Pound: ऐतिहासिक निर्णय! ब्रिटिश पाउंडवरून विन्स्टन चर्चिल यांच्यासह दिग्गजांचे चेहरे हटणार; नोटांवर दिसणार वन्यजीव

भारताची भूमिका आणि विमान सेवांवर परिणाम

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) या संपूर्ण घटनेवर तीव्र शब्दांत चिंता व्यक्त करत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “आम्ही सौदी अरेबियातील रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर होत असलेल्या वारंवार हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. नागरिक आणि त्यांच्या सुविधांवर होणारे असे हिंसक हल्ले पूर्णपणे अयोग्य आहेत.” भारताने मृतांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाचे व सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आपण तेथील सरकारसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम भारतीय प्रवाशांवरही झाला आहे. रियाधमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था पाहता, एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) या प्रमुख भारतीय विमान कंपन्यांनी रियाधसाठीच्या आपल्या विमानसेवांची स्थगिती वाढवली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसची उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत, तर एअर इंडियाची उड्डाणे १५ ऑक्टोबरपर्यंत रद्द राहतील असे जाहीर करण्यात आले आहे. अकासा एअरनेही यापूर्वीच आपली उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विमान कंपन्यांकडून तिकिटांचे पूर्ण पैसे परत (Refund) दिले जात आहेत किंवा कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवासाची तारीख बदलून देण्याचा पर्याय दिला जात आहे.

Web Title: Riyadh airport missile attack saudi arabia houthi casualties trump reaction hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Houthi
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय! बुढी गंडकी नदीच्या प्रवाहात घरे अन् पूल वाहून गेले; नागरिकांना हायअलर्ट, VIDEO VIRAL
1

Nepal Flood : नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय! बुढी गंडकी नदीच्या प्रवाहात घरे अन् पूल वाहून गेले; नागरिकांना हायअलर्ट, VIDEO VIRAL

British Pound: ऐतिहासिक निर्णय! ब्रिटिश पाउंडवरून विन्स्टन चर्चिल यांच्यासह दिग्गजांचे चेहरे हटणार; नोटांवर दिसणार वन्यजीव
2

British Pound: ऐतिहासिक निर्णय! ब्रिटिश पाउंडवरून विन्स्टन चर्चिल यांच्यासह दिग्गजांचे चेहरे हटणार; नोटांवर दिसणार वन्यजीव

US Politics : केटी झकेरिया व्हाईट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरी; घेणार कॅरोलिन लेविट यांची जागा, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
3

US Politics : केटी झकेरिया व्हाईट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरी; घेणार कॅरोलिन लेविट यांची जागा, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Yemen News : येमेनमध्ये हुथी बंडखोरांविरोधात मोठी लष्करी मोहीम; संघर्ष तीव्र, मध्यपूर्वेच्या सुरक्षेला धोका
4

Yemen News : येमेनमध्ये हुथी बंडखोरांविरोधात मोठी लष्करी मोहीम; संघर्ष तीव्र, मध्यपूर्वेच्या सुरक्षेला धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.