Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Politics : केटी झकेरिया व्हाईट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरी; घेणार कॅरोलिन लेविट यांची जागा, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

US Politics : कॅटी झकेरिया यांची व्हाईट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीमध्ये काम केले असून त्या ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 11, 2026 | 11:10 AM
Katie Zacharia White House Press Secretary Donald Trump Truth Social announcement

Katie Zacharia White House Press Secretary Donald Trump Truth Social announcement

Follow Us
Follow Us:
  • केटी झकेरिया यांची नवी नियुक्ती
  • माजी प्रेस सेक्रेटरींची एक्झिट
  • ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक व वकिलाचा अनुभव

अमेरिकेच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात व्हाईट हाऊसच्या मुख्य वक्त्याची आणि संवाद यंत्रणेची कमान एका अत्यंत विश्वासू वकिलाकडे सोपवली आहे. ट्रम्प यांनी आपले अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत वकील, मीडिया सल्लागार आणि पुराणमतवादी विचारवंत केटी झकेरिया (Katie Zacharia) यांची व्हाईट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरीपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.(US Politics)

डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवर मोठी घोषणा

ट्रम्प यांनी केटी झकेरिया यांचे कौतुक करताना म्हटले की, त्या सुरुवातीपासूनच एक अत्यंत निष्ठावान, प्रामाणिक आणि ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) चळवळीच्या खऱ्या पाठीराख्या राहिल्या आहेत. त्यांची आजवरची कामगिरी निर्दोष राहीली असून त्या व्हाईट हाऊसच्या पत्रकार समूहाशी अत्यंत प्रभावीपणे संवाद साधतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : CJP protest : जंतरमंतर आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद; संयुक्त राष्ट्रांची टिप्पणी भारताने फेटाळली, म्हटले, ‘हा आमचा अंतर्गत विषय

कोण आहेत केटी झकेरिया? जाणून घ्या त्यांचा व्यावसायिक प्रवास

केटी झकेरिया या व्यवसायाने एक अनुभवी वकील आणि राजकीय विश्लेषक आहेत. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या मोहिमेत आणि त्यांच्या मीडिया कंपनीत त्यांनी कायदेशीर तसेच संवाद सल्लागार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सध्या त्या ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG) मध्ये वरिष्ठ संवाद सल्लागार म्हणून काम पाहत होत्या, जी कंपनी ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मचे नियंत्रण करते.

Thank you to President Trump for the distinguished privilege of serving as White House Press Secretary. Serving President Trump and the American people at this critical 250-year mark is the honor of a lifetime. President Trump has shown America that we can be great again, and he works to effectuate that greatness every single day. His confidence is a true privilege, and his leadership is a blessing to this country. The work ahead is to continue delivering strong results for our Country and communicating to the American people the major wins that this Administration is making every single day. I look forward to working with the White House press corps, and with reporters across the country, to get that record out. Following the fabulous Karoline Leavitt is a high standard, and one worth meeting. God bless President Trump, and God bless America. — Katie Zacharia (@KatieZacharia) October 9, 2026

credit – social media and Twitter

यापूर्वी झकेरिया यांनी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) मध्ये प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. इमिग्रेशन अंमलबजावणीवर लक्ष ठेवणाऱ्या या विभागात त्यांनी सचिव क्रिस्टी नोएम यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते. याशिवाय त्यांनी ‘फिक्स कॅलिफोर्निया’ या पुराणमतवादी गटासोबतही काम केले असून त्या रिपब्लिकन पक्षात एक खंबीर आणि आक्रमक वक्त्या म्हणून ओळखल्या जातात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त

कॅरोलिन लेविट यांची जागा घेणार; ट्रम्प यांच्या ‘मशीनगन’ वक्तव्याची चर्चा

केटी झकेरिया या कॅरोलिन लेविट (Karoline Leavitt) यांची जागा घेणार आहेत. कॅरोलिन लेविट यांनी ट्रम्प प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर ऑगस्ट महिन्यात वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ट्रम्प यांनी लेविट यांच्या कामाची नेहमीच प्रशंसा केली होती. एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी लेविट यांच्या बोलण्याच्या वेगाचा संदर्भ देत, “जेव्हा त्या बोलतात तेव्हा त्यांचे ओठ मशीनगनसारखे वेगाने चालतात” असे विधान केले होते. ट्रम्प यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

आपल्या नियुक्तीनंतर केटी झकेरिया यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. ट्रम्प यांनी दाखवलेला विश्वास हा आपल्यासाठी मोठा सन्मान असून, व्हाईट हाऊसचे प्रतिनिधित्व करणे आणि ट्रम्प प्रशासनाचे ऐतिहासिक निर्णय व विजय अमेरिकन जनतेपर्यंत पोहोचवणे हे आपले मुख्य ध्येय असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Katie zacharia appointed new white house press secretary by donald trump hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
1

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले
2

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले

World News : क्या बात है; भारताला मनाई; मात्र रशियाकडून अमेरिकेची डिझेल खरेदी; ट्रम्प यांच्या निर्णयावरून संताप
3

World News : क्या बात है; भारताला मनाई; मात्र रशियाकडून अमेरिकेची डिझेल खरेदी; ट्रम्प यांच्या निर्णयावरून संताप

World News : ‘हाय मॉम’ नाही, आता ‘हाय जेस्टेटिंग’ म्हणायचं? ट्रम्प यांच्या विधानाने अमेरिकेत चर्चेला उधाण
4

World News : ‘हाय मॉम’ नाही, आता ‘हाय जेस्टेटिंग’ म्हणायचं? ट्रम्प यांच्या विधानाने अमेरिकेत चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.