Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nobel Prize: जागतिक अर्थकारणाला नवी दिशा; रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Nobel Prize : सर्वसामान्य लोकांचे निर्णय संपूर्ण अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम करतात हे समजून घेण्यातील योगदानाबद्दल रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 12, 2026 | 04:41 PM
Nobel Prize in Economics 2025 Robert E. Hall economics Nobel

Nobel Prize in Economics 2025 Robert E. Hall economics Nobel

Follow Us
Follow Us:
  • नोबेल पुरस्कार 2026 ची घोषणा
  • आर्थिक धोरणांना नवा दृष्टिकोन
  • महागाई आणि मंदीच्या अंदाजासाठी वरदान

आर्थिक जगतातील सर्वात मानाचा समजला जाणारा नोबेल पुरस्कार 2026 (Nobel Prize) जाहीर झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे छोटे-मोठे आर्थिक निर्णय आणि विचार संपूर्ण देशाच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर कसा खोलवर परिणाम करतात, हे आपल्या संशोधनातून सिद्ध करणारे दिग्गज अर्थतज्ज्ञ रॉबर्ट ई. हॉल (Robert E. Hall) आणि मायकेल वुडफोर्ड (Michael Woodford) यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या दोघांच्या संशोधनाने आधुनिक मॅक्रोइकोनॉमिक्स (स्थूल अर्थशास्त्र) कडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकला आहे.

पारंपारिक अर्थशास्त्रामध्ये केवळ मोठ्या कंपन्या, सरकारचे निर्णय आणि जागतिक बाजारपेठेवर जास्त भर दिला जात असे. मात्र, रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांनी हे सिद्ध केले की, जेव्हा एखाدی सामान्य व्यक्ती महागाई वाढेल असा विचार करून खरेदी कमी करते किंवा भविष्यातील नोकरीच्या अनिश्चिततेमुळे पैसे वाचवायला लागते, तेव्हा त्याचा थेट आणि मोठा परिणाम संपूर्ण देशाच्या जीडीपी (GDP), रोजगार निर्मिती आणि मंदीवर होत असतो.

रबर्ट ई. हॉल यांचे योगदान: मंदी, बेरोजगारी आणि ग्राहकांचे वर्तन

रबर्ट ई. हॉल यांनी आपल्या प्रदीर्घ संशोधनातून हे दाखवून दिले की, जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी येते, तेव्हा ती अचानक येत नाही. मंदी येण्यामागे लोकांचा खर्च करण्याचा कल आणि कंपन्यांचे गुंतवणूक धोरण यांच्यातील परस्परसंबंध कारणीभूत असतात. लोक जेव्हा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खर्च कमी करतात, तेव्हा उत्पादनांची मागणी घटते आणि पर्यायाने कंपन्यांना उत्पादन आटोते घ्यावे लागते, ज्यामुळे बेरोजगारी वाढते. हॉल यांच्या या सिद्धांतामुळे सरकार आणि धोरणकर्त्यांना मंदीच्या काळात योग्य पावले उचलण्यास मोठी मदत झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Emergency: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणीनंतर गव्हर्नर हाऊस पेटवले; पोलिसांचा थेट गोळीबार, स्थिती हाताबाहेर

त्यांनी मजुरीचे दर, कामगारांची उत्पादकता आणि कामगार बाजारातील चढ-उतार यांचे अत्यंत सूक्ष्म विश्लेषण केले. सामान्य माणूस महागाईच्या काळात कसा ताळमेळ साधतो आणि त्याचे हे वर्तन देशाच्या अर्थकारणावर कसा प्रभाव टाकते, हे समजून घेण्यासाठी हॉल यांचे संशोधन मार्गदर्शक ठरले आहे.

मायकेल वुडफोर्ड यांचे योगदान: मौद्रिक धोरण आणि लोकांच्या अपेक्षा

दुसरीकडे, कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक मायकेल वुडफोर्ड यांनी ‘मॉनेटरी पॉलिसी’ (मौद्रिक धोरण) आणि लोकांच्या अपेक्षा (Expectations) यांच्यातील संबंधांवर अभूतपूर्व प्रकाश टाकला. वुडफोर्ड यांनी दाखवून दिले की, रिझर्व्ह बँक किंवा फेडरल रिझर्व्हसारख्या मध्यवर्ती बँका जेव्हा व्याजदर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा केवळ प्रत्यक्षात घडणारी कृती महत्त्वाची नसते, तर सर्वसामान्य लोकांचा त्या निर्णयावर आणि भविष्यातील महागाईवर काय विश्वास आहे, हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते.

BREAKING NEWS
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2026 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel to Robert E. Hall and Michael Woodford “for microeconomic foundations of macroeconomic stabilisation.”
#NobelPrize https://t.co/2i7ktB1Q2b — The Nobel Prize (@NobelPrize) October 12, 2026

credit – social media and Twitter

जर लोकांना वाटले की भविष्यात महागाई वाढणार आहे, तर ते आजच जास्त खर्च करू लागतात, ज्यामुळे खरोखरच महागाई वाढते. याला ‘अपेक्षित महागाई’ (Inflation Expectations) म्हटले जाते. वुडफोर्ड यांनी हे सिद्ध केले की, मध्यवर्ती बँकांनी केवळ आकडेवारी सुधारण्यापेक्षा जनतेसोबत योग्य संवाद साधून भविष्याबद्दलचा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांच्या या सिद्धांतामुळे आज जगातील बहुतेक सर्व प्रमुख बँका आपले व्याजदर धोरण आखताना लोकांच्या मानसिकतेचा आणि अपेक्षांचा प्रामुख्याने विचार करतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan civil war: 40,000 पंजाब पोलिस लढणार इम्रान खानच्या बाजूने; पाकिस्तानात मुनीर अन् शहबाज सरकारच्या सत्तेला लागणार सुरुंग?

आजच्या डिजिटल युगात या संशोधनाचे महत्त्व का वाढले आहे?

आजच्या वेगवान डिजिटल आणि जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी, महागाई, युद्धे आणि पुरवठा साखळीतील बिघाड यामुळे सर्वसामान्य नागरिक सतत चिंतेत असतात. अशा वेळी एक साधा नागरिक जेव्हा पेट्रोलचे वाढते दर पाहून किंवा बँकेचे कर्जाचे हप्ते वाढल्यामुळे आपल्या घरातील मासिक बजेट बदलतो, तेव्हा तो एक प्रकारे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रचनेला आकार देत असतो.

रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांनी हेच वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केले की, अर्थशास्त्र हे केवळ कागदावरच्या मोठ्या आकडेमोडींचे नाही, तर ते कोट्यवधी सामान्य माणसांच्या दैनंदिन निर्णयांचे फलित आहे. या दोन्ही अर्थतज्ज्ञांच्या कामामुळे आज जागतिक स्तरावर मंदीचा सामना करणे, योग्य व्याजदर ठरवणे आणि आर्थिक स्थैर्य टिकवणे सोपे झाले आहे. यंदाचा नोबेल पुरस्कार हा खऱ्या अर्थाने त्या प्रत्येक सामान्य माणसाच्या विचारांचा गौरव आहे, जो आपल्या लहान-मोठ्या आर्थिक निर्णयांनी संपूर्ण जगाचे अर्थकारण चालवतो.

Web Title: Robert hall michael woodford win 2025 economics nobel prize hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • nobel prize
  • World news

संबंधित बातम्या

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात
1

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव
2

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव

Sudan: सुदान-इजिप्त सीमेवर भयंकर नरसंहार; सोन्याच्या खाणीवर हवाई हल्ल्यात 72 कामगार ठार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव
3

Sudan: सुदान-इजिप्त सीमेवर भयंकर नरसंहार; सोन्याच्या खाणीवर हवाई हल्ल्यात 72 कामगार ठार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष
4

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.