कडक निर्बंध (Strict Restrictions) असलेला सौदी अरेबिया (Saudi Arabia) आता उदारमतवादी (Liberal) होत आहे. सौदी अरेबियाला जगाच्या नजरेत ‘खुल्या विचारांचा देश’ म्हणून ओळखले जावे यासाठी येथे महिलांशी संबंधित अनेक नियम बदलले जात आहेत. अलीकडेच सौदी अरेबियातील प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोबाबत एक कायदा चर्चेत आहे.
सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबमध्ये सामील झाल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना (Georgina) यांच्या देशात राहण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वास्तविक, आखाती देशाचा कायदा याची परवानगी देत नाही, तर चला जाणून घेऊया अविवाहित जोडप्यांसाठी सौदी अरेबियामध्ये एकत्र राहण्याबाबत काय नियम आहेत.
[read_also content=”झालीये दैना! पाकिस्तानला वाटी घेऊन भीक मागण्यास भाग पाडले, पीएम मोदींचे वक्तव्य शाहबाजच्या देशात का व्हायरल होत आहे?, जाणून घ्या सत्य https://www.navarashtra.com/world/pakistan-to-go-around-the-globe-with-a-begging-bowl-why-is-pm-modi-statement-going-viral-in-shahbazs-country-watch-video-nrvb-362196.html”]
रोनाल्डोची लोकप्रियता, जगभरातील फुटबॉलप्रेम आणि ‘मध्यम’ प्रतिमेसाठी सौदी सरकार या नियमात तडजोड करण्यास तयार आहे. सौदी अरेबियामध्ये अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्यास मनाई आहे. इतकंच नाही तर लग्नाशिवाय मूल जन्माला घालणं हाही इथे गुन्हा आहे. रोनाल्डोसाठी हा नियमही मोडायला रियाद तयार आहे. २०१६ पासून एकत्र राहणाऱ्या रोनाल्डो आणि जॉर्जिना यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे.
सौदी अरेबियामध्ये लग्न न करता रूम शेअर करणे किंवा एकाच छताखाली राहणे हा गुन्हा आहे. कोणत्याही सामान्य सौदी नागरिकाने असे केल्यास त्याला कठोर शिक्षा दिली जाते. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना सौदीच्या वकिलांनी सांगितले की, नियम शिथिल केले जात आहेत कारण आता कायद्यांची पूर्वीसारखी काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. वकिलांनी सांगितले की, आता जोडप्यांना देशात लग्नाशिवाय एकत्र राहण्याची परवानगी आहे.
[read_also content=”काय द्याचं असं आहे! बायकोशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या कायद्याबाबत एवढं चर्वण का? जाणून घ्या ट्विटरवर तर्कांना का आलाय ऊत https://www.navarashtra.com/india/marital-rape-case-in-supreme-court-why-people-protesting-aggresively-on-twitter-wait-and-watch-nrvb-362174.html”]
मात्र, गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी किंवा संशयित आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. २०१९ मध्ये सौदी अरेबियाने एक मोठा नियम बदलला होता. त्यानंतर अविवाहित परदेशी जोडप्यांना हॉटेलच्या खोल्या शेअर करण्याची परवानगी होती. सौदी सरकारने नवीन व्हिसा नियम जाहीर केले होते.
यापूर्वी सौदी अरेबियात येणाऱ्या जोडप्यांना विवाहित असल्याचा पुरावा द्यावा लागत होता. सौदी अरेबिया अनेक वर्षांपासून पर्यटनाला चालना देण्यासाठी असे बदल करत असल्याचे मानले जाते. आखाती देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग तेल आणि पर्यटनावर अवलंबून आहे.