Russia attacks Kiev before peace talks begin
कीव: काही तासांपूर्वीच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाशी शांतता चर्चा करण्यास तयारी दर्शवली होती. याशिवाय त्यांनी रशियाला कुर्स्क क्षेत्र परत देण्यासही तयार असल्याचे म्हटले होते. त्यांनी अमेरिकेला शांतता चर्चेसाठी तयारी त्यांच्या हमी मागणी केली होता. मात्र, ही चर्चा सुरु होण्यापूर्वीच रशियाने युक्रेनची राजधानी कीववर तीव्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यात एक नागरिकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या जखमींमध्ये एका 9 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. कीवच्या अनेक भागांत आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कीवचे महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील चार जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन सेवा तातडीने बोलावण्यात आली आहे.
❗️Київщина: триває ліквідація наслідків вранішньої російської масованої ракетної атаки
Рятувальники продовжують ліквідацію пожежі нежитлових приміщень в одному з районів області.
Попередньо, без постраждалих та загиблих. pic.twitter.com/fn1mIxeQZR
— DSNS.GOV.UA (@SESU_UA) February 12, 2025
शांतता चर्चा होण्यापूर्वीच युद्ध सुरु होणार?
रशियाने तीन वर्षांपूर्वी युक्रेनवर सुरू केलेल्या युद्धाला संपवण्यासाठी शांती चर्चेची शक्यता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कीव आणि पुतिन यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली होती. यामुळे युद्धविरामासाठी नव्या प्रयत्नांना गती मिळाली होती. मात्र, या नव्या हल्ल्यामुळे शांती चर्चेच्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे प्रमुख सहायक अँड्री यरमक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रशियाच्या हलल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “रशियाने कीव आणि आसपासच्या परिसरावर मिसाइल हल्ला केला आहे. व्लादिमीर पुतिन पुन्हा युद्ध सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.”
युक्रेन शांतता चर्चेसाठी तयार
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लाची माहिती मिळताच शहरात सायरन वाजवले गेले आणि विविध भागांत आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे कीवच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. झेलेन्स्की यांनी एक दिवस आधीच एका वृत्तपत्रावला मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यान त्यांन “युक्रेन रशियाच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांच्या बदल्यात युक्रेनची जमीन परत मिळवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते.” तसेच, शांती करार टिकून राहण्यासाठी अमेरिकेची हमी हवी असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
युद्धाच्या प्रारंभापासूनच युक्रेनच्या अनेक भागांत सातत्याने हल्ले होत आहेत. या हल्ल्यामुळे रशिया-युक्रेनमध्ये असलेले तणाव अधिकच वाढले आहेत. आता या ताज्या हल्ल्यानंतर शांती चर्चेसाठी घेतलेले प्रयत्न कितपत यशस्वी ठरतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.