Russia completes delivery of Su-30 fighter jets to Myanmar army
जेरुसेलम: सध्या म्यानमारमध्ये राजकीय आणि लष्करी अस्थिरतेचे वातावरण आहे. याच दरम्यान मान्यमारच्या रशियाशी वाढत चाललेल्या संरक्षण सहकार्याने आशियाई प्रदेशातील सामरिक संतुलन बदलण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितचीनुसार, रसियाने म्यानमारला नुकतेच सहा Su-30 एसएमई लढाऊ विमाने दिली आहेत. मात्र, यामुळे चीनच्या अस्वस्थतेत वाढ झाली आहे. म्यानमारला आपल्या प्रभावाखाली ठेवण्याचा चीनचा दीर्घकालीन प्रयत्न असताना, रशियाचे हे पाऊल चीनसाठी चिंतेचा विषय ठरले आहे.
Su-30 विमानांची डिलिव्हरी आणि म्यानमारची तयारी
रशियाकडून म्यानमारने सहा 6 Su-30 एसएमई लढाऊ विमाने खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2018 साली झालेल्या 400 मिलियन डॉलरच्या कराराअंतर्गत ही विमाने 15 डिसेंबर 2024 रोजी मांडलेजवळील मेइक्तिला एअर बेसवर म्यानमारच्या हवाई दलात सामील करण्यात आली. ही विमाने देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे आणि दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी उपयुक्त मानली जात आहेत.
Su-30 विमाने म्यानमारच्या हवाई दलाचा मुख्य आधार
रशियाचे उप संरक्षण मंत्री यांनी सांगितले की ही विमाने म्यानमारच्या हवाई दलाचा मुख्य आधार बनतील. या विमानांना देशाच्या वेगवेगळ्या भागात सुरक्षा कवच पुरवण्यासाठी तैनात केले जात आहे. याआधी म्यानमार चीनच्या जेएफ-17 थंडर विमानांचा वापर करत होता. मात्र, या विमानांमधील तांत्रिक अडचणींमुळे म्यानमारने रशियाच्या Su-30 विमानांना प्राधान्य दिले.
चीनची चिंता वाढली
रशियाच्या या संरक्षण सहकार्यामुळे चीन अस्वस्थ झाला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या या कृतीवर शी जिनपिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. म्यानमारवर आपला दबदबा कायम ठेवण्याचा चीनचा प्रयत्न असूनही, रशियाचे वाढते अस्तित्व त्याच्या प्रभाव क्षेत्राला आव्हान देत आहे. सोशल मीडियावरही रशियाच्या हस्तक्षेपाबद्दल चीनमधील नाराजी उघडपणे दिसून येत आहे.
म्यानमारमधील काही बंडखोर गट भारताच्या सीमेलगत सक्रिय आहेत. या बंडखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्यानमार सरकार रशियन विमानांचा उपयोग करू शकते. त्यामुळे म्यानमारच्या लष्करी ताकदीत लक्षणीय वाढ होणार आहे, ज्यामुळे प्रदेशातील स्थिरतेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
क्षेत्रीय परिणाम आणि भविष्यातील दिशा
म्यानमारचे हे पाऊल लष्करी तसेच कूटनीतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरते. रशियाच्या मदतीमुळे म्यानमारला आपले सामरिक उद्दिष्ट साध्य करता येईल, परंतु यामुळे चीन-म्यानमार संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. आशियातील सामरिक संतुलन, म्यानमारमधील विद्रोही गट, आणि चीन-रशिया यांच्यातील स्पर्धा यावर पुढील काळात लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या घडामोडी भविष्यात जागतिक पातळीवरही परिणाम करू शकतात.