'याची किंमत मोजावी लागेल'; ट्रुडोंचे माजी सहाय्यक जगमित सिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याच्या प्रस्तावाने सध्या कॅनडा आणि अमेरिकेत वाद सुरु आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. जस्टिन ट्रुडो आणि भारतीय वंशाच्या माजी खासदार अनिता आनंद यांनी ट्रम्प यांनी कडाडून विरोध केला होता. त्यांनी म्हटले होते की, कॅनडा हा स्वतंत्र्य देश आहे आणि अमेरिकेत विलिन होणे शक्य नाही.
जगमीत सिंग यांचा देखील ट्रम्प यांना विरोध
दरम्यान, न्यू डेमोक्रेटिक पार्टी (NDP) चे नेते आणि कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे माजी सहकारी जगमीत सिंग यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांना कॅनडच्या टॅरिफ वाढ आणि कॅनाडचा अमेरिका विलीनीकरणाच्या प्रस्तावांवर कडक शब्दांत तीव्र विरोध केला आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या 47व्या अध्यक्षपदाची शपथविधी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, जगमीत सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कनॅडा बिकाऊ नाही, ना आता, ना कधीही भविष्यात.”
I have a message for Donald Trump.
We’re good neighbours.
But, if you pick a fight with Canada – there will be a price to pay. pic.twitter.com/o60c4qIyza
— Jagmeet Singh (@theJagmeetSingh) January 12, 2025
आणखी काय म्हणाले जगमीत सिंग?
जगमीत सिंग म्हणाले, “मी संपूर्ण देशभर फिरलो आहे आणि मला खात्री आहे की कॅनडाचे नागरिक आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगतात. आम्हाला आमच्या देशाची सार्वभौमत्व टिकवण्यासाठी लढण्याची पूर्ण तयारी आहे.” त्यांनी अमेरिकेतील जंगलातील आगीच्या संदर्भात नमूद केले की, “जेंव्हा अमेरिकेत भयावह जंगली आग लागली होती, तेंव्हा कॅनडाच्या अग्निशामकांनी पुढाकार घेत अमेरिकेला मदत केली. हे दाखवते की आम्ही कोण आहोत आणि आम्ही आपल्या शेजाऱ्यांचे कसे समर्थन करतो.”
जगमीत सिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे की, “जर त्यांना वाटते की ते कॅनडाशी संघर्ष करू शकतात, तर त्यांना याची किंमत मोजावी लागेल.” त्यांनी पुढे म्हटले, “जर ट्रम्प यांनी 25 टक्क्यांनी टॅरिफ वाढवले, तर आम्ही देखील तेवढाच प्रतिउत्तरादाखल टॅरिफ लावू. कॅनडाच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या इतर नेत्यांनीही असाच ठाम दृष्टिकोन बाळगावा, असे माझे मत आहे.” जगमीत सिंग यांच्या या वक्तव्यामुळे ट्रम्प प्रशासनाला कॅनडाशी असलेल्या संबंधांवर विचार करावा लागेल. तसेच, त्यांनी दिलेली चेतावणी कॅनडाच्या सार्वभौमत्वासाठी कठोर भूमिका घेण्याचा इशारा आहे.