Why did Chinese President Xi Jinping suddenly arrive in Tibet
Xi Jinping Tibet visit : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अचानक तिबेटच्या ल्हासा येथे पोहोचले, यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष तिबेटवर केंद्रित झाले आहे. त्यांच्या या दौऱ्याचे कारण केवळ चीनच्या स्वायत्त प्रदेश तिबेटच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या समारंभाशी संबंधित आहे, की त्यामागे दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीवर असलेला वादही आहे, हे चर्चेचे मुख्य कारण बनले आहे.
शी जिनपिंग यांनी गुरुवारी ल्हासाच्या १७ व्या शतकातील पोटाला पॅलेसमोर आयोजित भव्य परेडमध्ये भाग घेतला. पोटाला पॅलेस हे दलाई लामांचे ऐतिहासिक निवासस्थान आहे आणि १९५९ मध्ये दलाई लामा भारतात पळून गेले होते. या परेडमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार उपस्थिती दर्शवली, तर स्थानिकांना चीनच्या तत्त्वज्ञानाची आठवण करून दिली गेली.
दलाई लामा यांचा वय सध्या ९० वर्षांचे आहे आणि त्यांनी काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट केले आहे की ते स्वतः आपला उत्तराधिकारी निवडतील. मात्र चीन सरकारने आधीच म्हटले आहे की, तिबेटी आध्यात्मिक नेत्याचा उत्तराधिकारी निवडण्याचा हक्क केवळ चीनला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांचा तिबेट दौरा केवळ उत्सवासाठीच नाही, तर चीनच्या दृष्टीने स्थानिक राजकीय स्थिरता आणि नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल
शी जिनपिंग यांचा दौरा उच्चस्तरीय शिष्टमंडळासह झाला. यामध्ये चीनचे सर्वोच्च राजकीय सल्लागार वांग हुनिंग, चीफ ऑफ स्टाफ कै ची, उपपंतप्रधान हे लाइफेंग आणि मंत्री वांग शियाओहोंग यांचा समावेश होता. त्यांनी तिबेटी पोलिस अधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि चीन समर्थित पंचेन लामाशी देखील संवाद साधला.
शी जिनपिंग यांनी त्यांच्या भाषणात तिबेटमधील चीनविरोधी वातावरण संपवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले, ज्यांनी दलाई लामांच्या समर्थकांवर कठोर कारवाई केली आहे. त्यांचे स्पष्ट संदेश होते: “तिबेटवर राज्य करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक स्थिरता आवश्यक आहे.” यामध्ये धार्मिक समाजाशी वांशिक एकता आणि सुसंवाद राखणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनने १९५१ मध्ये तिबेटवर आपला दावा सुरू केला आणि १९५९ मध्ये पूर्ण ताबा मिळवला. १९६५ मध्ये माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली तिबेट स्वायत्त प्रदेश म्हणून स्थापन करण्यात आला. चीनने तिबेटी मठांवर नियंत्रण प्रस्थापित केले, हजारो लोकांना तुरुंगात टाकले आणि स्थानिकांना कम्युनिस्ट विचार स्वीकारण्यास भाग पाडले. आजही चीनचा उद्देश तिबेटवरील आपला प्रभाव मजबूत ठेवणे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे
शी जिनपिंग यांचा तिबेट दौरा केवळ ऐतिहासिक वर्धापन दिनाच्या निमित्ताने नाही, तर राजकीय स्थिरता, चीनच्या नियंत्रणाची पुन्हा आठवण, आणि दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीसंदर्भातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आहे. या दौऱ्यामुळे तिबेटी जनता, चीनविरोधी गट, आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष पुन्हा तिबेटवर केंद्रित झाले आहे.