फोटो सौजन्य AI
भारतातील कंपन्यांसाठी तब्बल १०५ विमानांच्या संभाव्य वितरण आणि उत्पादन व्यवस्थेबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, ही संख्या सध्या प्रस्तावित व्यवस्था असून अंतिम खरेदी करार अद्याप बाकी आहेत.
या प्रस्तावात Pinnacle Air साठी ५०, Air Kerala साठी २० आणि Sleek Aviation साठी ३५ विमानांचा समावेश आहे. यातील Pinnacle Air आणि Sleek Aviation यांच्यासोबत प्राथमिक करार झाले आहेत, तर Air Keralaसाठी आणखी २० विमानांच्या व्यवस्थेवर चर्चा सुरू आहे.
Il-114-300 हे सुमारे ६८ प्रवासी क्षमतेचे ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप विमान आहे. छोट्या आणि मध्यम शहरांना जोडण्यासाठी तसेच तुलनेने कमी पायाभूत सुविधा असलेल्या विमानतळांवर सेवा देण्यासाठी हे विमान उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे भारताच्या प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीसाठी या विमानाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
या संपूर्ण योजनेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकलायझेशन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण. सुरुवातीच्या टप्प्यात भारतासाठी काही विमाने रशियात तयार केली जाणार आहेत. त्यानंतर भारतात उत्पादनासाठी आवश्यक तांत्रिक आणि व्यावसायिक करार निश्चित केले जाणार आहेत.
रशियाच्या उद्योग आणि व्यापार मंत्रालयाच्या माहितीनुसार, Il-114-300 च्या भारतातील उत्पादनाच्या स्थानिकीकरणाच्या अटी २०२६ अखेर किंवा २०२७च्या सुरुवातीपर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. UACनेही स्थानिकीकरण कार्यक्रमाला मंजुरी मिळाल्यानंतर भारतासाठी विमानांचा पुरवठा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.
Kenya News : ‘कुत्रा आमच्यावर सोडल्यासारखे’; परदेशी व्यापाऱ्यांवर कारवाईने भीतीचे वातावरण
भारतामध्ये प्रादेशिक विमान वाहतूक वाढवण्यासाठी UDANसारख्या योजनांवर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत Il-114-300 सारख्या विमानांना मोठी बाजारपेठ मिळू शकते. छोट्या शहरांमधील प्रवासी वाहतुकीसोबतच कार्गो, वैद्यकीय सेवा आणि बचावकार्यांसाठीही या प्रकारच्या विमानांचा वापर होऊ शकतो.
भारत आणि रशियामधील हे सहकार्य केवळ विमान खरेदीपुरते मर्यादित राहण्याची शक्यता नाही. विमान उत्पादन, तंत्रज्ञान हस्तांतरण, देखभाल आणि स्थानिक घटक निर्मिती यामुळे भारताच्या एव्हिएशन इंडस्ट्रीला चालना मिळू शकते. त्यामुळे १०५ विमानांचा हा प्लॅन प्रत्यक्षात आला, तर भारताच्या नागरी विमान क्षेत्रात रशियन विमानांची नवी एंट्री होण्याबरोबरच देशांतर्गत विमाननिर्मितीलाही मोठा धक्का मिळू शकतो.






