फोटो सौजन्य सोशल मीडिया
सौदीच्या ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार रियाध आणि मदिना भागातील पाईपलाइनवर अनेक ड्रोन हल्ले झाले . या हल्ल्यांमध्ये काही जण जखमी झाले असून , त्यांना वैद्यकीय उपचार देण्यात आले . हल्ल्यानंतर आपत्कालीन आणि तांत्रिक पथकांनी घटनास्थळी पोहोचून पाईपलाइनची सुरक्षा तपासली .
सौदीने पाइपलाइनची वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरती थांबवली आहे . पाईपलाईन पुन्हा कधी सुरु होईल , याबाबत अद्याप निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही .
China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी
ईस्ट – वेस्ट पाईपलाइनचे महत्व केवळ सौदी पुरते मर्यादित नाही . ही पाईपलाईन होर्मूझच्या समुद्रधुनीला पर्यायी तेलवाहतूक मार्ग उपलब्ध करून देते . होर्मूझमधील वाहतुकीवर आधीच तणावाचा परिणाम झालेला असताना या पाईपलाइनवर झालेला हल्ला जागतिक ऊर्जा बाजारासाठी मोठा धक्का मानला जात आहे .
अलीकडच्या काळात या पाईपलाइनवर दररोज सुमारे ४ ते ५ दशलक्ष बॅरल तेल वाहून नेले जात असल्याचे सांगितले जाते . त्यामुळे दीर्घकाळ पाईपलाईन बंद राहिल्यास सौदीच्या तेल निर्यातीवर तसेच जागतिक पुरवठयावर दबाव वाढण्याची शक्यता आहे .
Kenya News : ‘कुत्रा आमच्यावर सोडल्यासारखे’; परदेशी व्यापाऱ्यांवर कारवाईने भीतीचे वातावरण
या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम आता थेट जागतिक ऊर्जा सुरक्षेवर होत असल्याचे चित्र आहे . सौदीच्या म्हणण्यानुसार , ड्रोन इराकच्या दिशेने आले होते . इराकनेही या घटनेनंतर सुरक्षाव्यवस्था कडक तपास करत आहेत . दरम्यान लाल समुद्र आणि बाब -अल – मंदेब परिसरातील वाढता तणावही तेल वाहतुकीसाठी चिंतेचा विषय बनला आहे .
होर्मूझ आणि लाल समुद्र या दोन्ही महत्वाच्या मार्गावर दबाव वाढल्यास जगभरातील तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात . भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे .






