Russia says PM Modi invited for 80th Victory Day Parade
मॉस्को: भारत-रशिया गेल्या अनेक वर्षांपासून चांगले मित्र देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील मैत्री देखील दृढ आहे. अनेक वर्षांपासून चांगले मित्र देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील मैत्री देखील दृढ आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींना पुतिन यांच्याकडून रशियाच्या दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवरील विजयाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त 9 मे रोजी होणाऱ्या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे.
ही माहिती रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को यांनी दिली. त्यांनी म्हटले की, मॉस्कोला आशा आहे की भारतीय पंतप्रधान 9 मे च्या परेडसाठी उपस्थित राहतील. दरम्यान भारताकडून यासंबंधित अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
रशियाने दुसऱ्या महायुद्धातील जनर्मनीवरील विजयाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्तच्या परेडसाठी अनेक मैत्रीपूर्ण देशांच्या नेत्यांना आमंत्रण दिले असल्याचेही रुडेन्को यांनी सांगितले.
रशियन मीडिया रिपोर्टनुसा, रुडेन्को म्हटले आहे की, आमंत्रण आधीच पाठवण्यात आले आहे. सध्या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे आयोजन केले जात आहे. शिवाय भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील रशियाला जाण्याची शक्यता आहे. सध्या राजनाथ सिंह यांच्या भेटीचेही नियोजन सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवरी 1945 मध्ये सोव्हिएत सैन्याने जर्मनीविरुद्ध युद्ध सुरु केले होते. या युद्धाचा शेट 9 1945 मध्येच झाला. कारण सेनापती-प्रमुखांनी जर्मनीच्या बिनशर्त आत्मसमर्पणाच्या कायद्यावर स्वाक्षरी केली.
सध्या पंतप्रधान मोदी जुलै 2025 मध्ये रशियाला भेट देणार असल्याची चर्चा आहे. त्यांची ही भेट पाच वर्षांतील पहिलीच भेट असणार आहे. यापूर्वी 2019 मध्ये आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी सुदूर पूर्वेकडील व्लादिवोस्तक शहरात गेले होते. या दरम्यान त्यांनी पुतिन यांच्या भेट घेतली होती. त्यानंतर मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. केवळ चार तासासाठी पुतिन यांनी भारताला भेट दिली होती.
सध्या दोन्ही देशांच्या नेत्यांच्या भेटीचे आयोजन सुरु आहे. लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. शिवाय, या भेटीदरम्यान रशिया-युक्रेन युद्ध, तसेच अमेरिकेने रशियन तेल कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच भारत-रशिया संबंध अधिक दृढ करण्याची द्विपक्षीय चर्चेवर देखील लक्ष केंद्रित केले जाईल. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिन यांच्या संपर्कात आहे. दोन्ही नेते आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांदरम्यान भेट घेण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेतन्याहू यांना अटकेची भीती? 400 किमी प्रवास करुन पोहोचले अमेरिकेत