Russia Tests New Version of Sukhoi Fighter Jet, with Ai Power
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई केली. भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करुन टाकले. यामुळे पाकिस्तान तिथर-बिथर झाला होता. दरम्यान भारताच्या या मोहीमेत सुखोई SU-30MKI या लढाऊ विमान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या लष्करी ताकदीची ओळख सर्वांना झाली. यामुळे सुखोईचे नाव ऐकताच भल्या भल्या शत्रूची घाबरगुंडी उडते.
आता या लढाऊ विमान सुखोईची आणखी ताकद वाढणार आहे. रशियाने सुखोईची एक नवी अत्याधुनिक आवृत्ती सादर केली आहे. रशियाने सुखोई-एसयू-५७एम लढाऊ विमानामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याची यशस्वी चाचणी देखील करण्यात आली आहे. या एआय तंत्रज्ञानामुळे सुखोईची ताकद अधिक वाढली आहे. सध्या याची जगभारतील देशांमध्ये चर्चा सुरु आहे. यामुळे चीनसह, पाकिस्तान, तुर्की यांसारख्या शत्रू देशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
रशियाने केलेल्या एआय तंत्रज्ञानाच्या चाचणीदरम्यान या लढाऊ विमानाच्या कॉकपिटमध्ये एक पायलट देखील उपस्थित होता आणि ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली. ही हवाई क्षेत्रातील सर्वात मोठी कामगिरी आहे. कॉकपिटमध्ये पायलट उपस्थि होता, परंतु उड्डाणाचे नियंत्रण, नेव्हिगेशन आणि टार्गेट सर्व AI च्या मदतीने चालवण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे भारतीय हवाई दलाला मोठी मदत होणार आहे.
संरक्षण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, AI च्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात हवाई युद्धता सुखोई एक महत्त्वाचा भाग बनू शकते. सुखोईमधील हे नवीन तंत्रज्ञान अमेरिकेच्या f-22 रॅप्टर आणि f-35 लाईटनिंग २ सारख्या विमानांना टक्कर देणार आहे. या नव्या प्रकल्पाचा उद्देश पाचव्या पिठीतील लढाऊ विमाने विकसित करणे होता. हा उद्देश यशस्वी झाला आहे. Su-57M ची नवी आवृत्ती Su-57 आहे.
सुखोरई जेट्स हे भारतीय हवाई दलाच्या ताकदीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यामुळे भारताचे संरक्षण क्षेत्र मजबूत आहे. सध्या भारताच्या हवाई दलाकडे २५० हून अधिक Su-30MKI विमाने आहे.
तसेच भारताचा रशियासोबत संरक्षण भागीदार करार आहे. यानुसार, ही विमाने हिंदुस्तान एरोनॅटिक्स लिमिटेड (HAL)द्वारे एकत्रित केली जात आहे. यामुळे भारताच्या हवाई दलात आधुनिक तंत्रज्ञानाटचा समावेश होत आहे.