Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानचे नुकसान झाले असल्याचे मंत्री इशाक दार यांनी कबुल केले आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईने पाकिस्तानला फटका बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 28, 2025 | 05:52 PM
pakistan fm ishaq dar admits damge to nur khan air base in operation sindoor

pakistan fm ishaq dar admits damge to nur khan air base in operation sindoor

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा करारी वार
  • ३६ तासांत किमा ८० ड्रोन हल्ले
  • पाकिस्तानचे मोठे नुकसान
  • मंत्री इशाका दार यांची मोठी कबुली
Pakistan news in Marathi : इस्लामाबाद : अखेर पाकिस्तानने (Pakistan) भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या नुकसानीची कबुली दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठा कारवाई केली होती. भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मोहिम राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्ताने देखील हल्ले सुरु केले होती. याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानला धुळ चटावली होती. परंतु पाकिस्तान यामध्ये त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचा आणि त्यांनी भारताला प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला होता. मात्र आता त्यांची पोल-खोल झाली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारताच्या हल्ल्यात त्यांचे मोठे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे पारडे जड? यूएस-चीन अहवालाच्या नापाक दाव्याने पुन्हा वादाची ठिणगी

पाकिस्तानच्या नूर-ए-खान एअरबेसचे मोठे नुकसान

इशाक दार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान हा खुलासा केला. त्यांनी म्हटले की, भारताने अवघ्या ३६ तासांता किमान ८० ड्रोन पाकिस्तानवर डागले होते. यातील बहुतेक ड्रोन पाडल्याचा दावा त्यांनी केला. परंतु हेही मान्य केले की यातील एका ड्रोनने पाकिस्तानच्या नूर-ए-खान एअरबेसला उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यात अनेक सैनिक जखमी झाल्याची कबुली देखील इशाक दार यांनी दिली. नूर-ए-खान एअरबेस हा पाकिस्तानचा सर्वात महत्त्वाच आणि प्रमुख लष्करी तळ आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यान पाकिस्तानच्या इतर लष्करी तळांना देखील लक्ष्य केले होते. यामध्ये सरगोधा, रफीकी, जैकोबाबद, मुरीदके यांसारख्या तळांचा समावेश होता. इशाक दार यांनी या तळांची दुरुस्ती केली असल्याचे सांगितले परंतु उपग्रह छायाचित्रांमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

याच वेळी भारताचे निवृत्त लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लो यांनी देखील पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी देखील यापूर्वी नूर खान एअरबेसवर भारतीय हल्ल्या झाल्याची कबुली दिली होती.

पहलगाम हल्ला (Pahalgam Attack)

भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या हल्ल्याने संपूर्ण भारतच नव्हे, तर जगही हादरले होते. या हल्ल्यानंतर भारतामध्ये संतापाची लाट उसळली होती. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत  पाकिस्तानला दहशतवादविरोधी कारवाई करण्याचा कठोर इशारा दिला. यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवस संघर्ष सुरु होता, ज्यामध्ये पाकिस्तानची पळता भूई झाली होती.

पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणती दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली होती?

    Ans: भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. यामध्ये मुजफ्कराबाद, मुरीदके, बहावलपूर आणि कोटली यांसारख्या दहशतवादी ठिकाणांना उडवून दिले होते.

  • Que: भारताने पाकिस्तानची कोणती शस्त्रे युद्धात उद्ध्वस्त केली?

    Ans: भारताने युद्धात पाकिस्तानची चिनी चे J-10 लढाभ विमान आणि अनेक पाकिस्तान लष्करी विमाने उद्ध्वस्त केली आहेत. चिनची संरक्षण प्रणाली देखील भारताने युद्धात नष्ट केली होती.

  • Que: भारत आणि पाकिस्तानमध्ये का सुरु होते युद्ध?

    Ans: २२ एप्रिल रोजी भारताच्या जम्मु-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ नागरिक ठार झाले होते. यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबादार धरले होते. यामुळे दोन्ही देशात तीव्र युद्ध सुरु झाले होते.

  • Que: पहलगाम येथे हल्ला कधी झाला होता?

    Ans: २२ एप्रिल रोजी भारताच्या जम्मु-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता.

  • Que: पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी काय कबूल केले?

    Ans: पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार भारताच्या हल्ल्यात ऑपरेशनि सिंदूरमध्ये रावळपिंडीतील नूर-ए-खान एअरबेरसचे नुकसान झाल्याचे आणि अनेक सैनिक जखमी झाल्याचे कबुल केले आहे.

Web Title: Pakistan fm ishaq dar admits damge to nur khan air base in operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 05:52 PM

Topics:  

  • Indian Air Force
  • Operation Sindoor
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा
1

Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा

Myanmar Election : सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
2

Myanmar Election : सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

असा मालक मिळायला तर नशीबच लागेल! कंपनी विकून मालकाने 540 कर्मचाऱ्यांना वाटले तब्बल 2000 कोटी
3

असा मालक मिळायला तर नशीबच लागेल! कंपनी विकून मालकाने 540 कर्मचाऱ्यांना वाटले तब्बल 2000 कोटी

अमेरिका नव्हे तर ‘या’ अरब देशाने केले हजारो भारतीयांना हद्दपार; MEA च्या आकडेवारीतून धक्कादायक खुलासा
4

अमेरिका नव्हे तर ‘या’ अरब देशाने केले हजारो भारतीयांना हद्दपार; MEA च्या आकडेवारीतून धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.