Russia-Ukraine peace talks in Istanbul Zelensky calls for g-7 level sanction on russia
इस्तंबूल: गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावर तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाने कठोर भूमिका घेतली. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांनी इस्तंबूलच्या सिरागन पॅलेसमध्ये शांतता चर्चेचे अध्यक्षपद भूषवले. या चर्चेचा उद्देश दोन्ही देशांच्या युद्धबंदीच्या अटींवर चर्चा करणे होता. दोन्ही देशांनी युद्धबंदी स्वीकारावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
दरम्यान या चर्चेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर नवीन निर्बंध लादले. तेल व्यापर, टॅंकरचा मर्यादित वापर अशा मागण्यात केल्या. मीडिया रिपोर्टनुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युरोपमधून नव्हे तर संपूर्ण रशियावर निर्बंध लादले पाहिजेत.G-7 पातळीवर संयुक्त राष्ट्रांनी रशियावर निर्बंध लादण्याची गरज आहे. यामध्ये अमेरिकेपासून भारतापर्यंत जगातील प्रत्येक देशाचा समावेश असावा असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही.
दरम्यान लिथुआनियातील विल्निअस येथे बोलताना दोन्ही देशांनी तुर्की मार्फत कागदांची देवाणघेवाण केली. तसेच युद्धकैंद्यांच्या सुटकेवर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. या युद्धबंदीच्या काळात रशिया आणि युक्रेनमधील सहा हजार सैनकिांच्या मृतदेहांच्या देवाण-घेवाणीवर चर्चा झाली. परंतु पूर्णत:युद्धबंदीबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच युक्रेनने रशियाच्या दोन लष्करी तळांवर हल्ला केला होता. यामध्ये रशियाचे मोठे नुकसान झाले. रशियाचा ओलेन्या आणि बेलाया लष्करी तळांना युक्रेनियन सैनिकांनी उद्ध्वस्त केले. यामध्ये रशियाची ४० लढाऊ विमाने नष्ट झाली. या हल्ल्याने रशिया हादरला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली. यामध्ये रशियाच्या Tu-95, Tu-22 आणि A-50 महागड्या आणि दुर्मिळ A-50 गुप्तचर विमानांसह मोठ्या बॉम्बर्सचे नुकसान युक्रेनने केले.
यापूर्वी दोन वेळा शांतता चर्चा
तसेच यापूर्वी देखील दोन वेळा रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चा झाली. परंतु या चर्चेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की उपस्थित राहिले नाही. तसेच चर्चा होऊनही युद्धबंदीबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय दोन्ही देशांमध्ये झालेला नाही. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे.