
फोटो सौजन्य सोशल मीडिया
मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यामुळे अनेक निवासी इमारती, औद्योगिक ठिकाणे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. हिवाळ्यापूर्वी युक्रेनच्या ऊर्जा व्यवस्थेवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
रशियाने या हल्ल्यात सुमारे ७० मिसाईल आणि मोठ्या संख्येने ड्रोनचा वापर केल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. राजधानी कीव्हसह चेर्निहिव्ह, द्निप्रो, पोल्टावा, खार्किव्ह आणि इतर भागांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या कारवाईला ‘मोठा हल्ला’ म्हणत युक्रेनमधील लष्करी आणि औद्योगिक ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.
दुसरीकडे, युक्रेनने निवासी भाग आणि ऊर्जा सुविधांनाही मोठा फटका बसल्याचे म्हटले आहे. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने अनेक मिसाईल आणि ड्रोन पाडल्याचा दावा केला असला तरी सर्व हल्ले रोखण्यात यश आले नाही.
World News: तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
चेर्निहिव्ह प्रांतातील प्रिलुकी शहराला या हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला. एका रशियन मिसाईलच्या हल्ल्यात पाच मजली निवासी इमारतीचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली असून त्यात चार मुलांचा समावेश आहे.
सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले असण्याची शक्यता असल्याने बचावकार्य सुरू ठेवण्यात आले. कीव्हमध्येही निवासी आणि इतर इमारतींचे नुकसान झाले असून नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतला.
Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
या हल्ल्यात युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. हल्ल्यानंतर कीव्हसह अनेक भागांमध्ये आपत्कालीन वीजकपात लागू करण्यात आली. हिवाळा जवळ येत असताना वीजपुरवठ्यावर होणारा परिणाम युक्रेनसाठी मोठे आव्हान ठरू शकतो.
झेलेन्स्की यांनी रशियाच्या बॅलिस्टिक मिसाईल्सना रोखण्यासाठी अधिक हवाई संरक्षण यंत्रणेची गरज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, युक्रेननेही रशियातील तेलसाठे आणि ऊर्जा सुविधांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे युद्धातील हवाई संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.