फोटो सौजन्य AI
मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ही आयात जवळपास ६९ टक्क्यांनी वाढली आहे . या आकडेवारीमुळे दोन्ही देशांमधील व्यापाराचे वास्तव आणि पडद्यामागे सुरु असलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत नव्याने चर्चा सुरु झाली आहे .
पाकिस्तानच्या स्टेट बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ,जुलै ते सप्टेंबर २०२६ या तीन महिन्यात पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत . मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा ३६.६ दशलक्ष डॉलर्स होता म्हणजेच एका वर्षात आयातीमध्ये जवळपास ६९ टक्क्यांची वाढ झाली आहे . विशेष म्हणजे या काळात पाकिस्तानकडून भारतात कोणत्याही निर्यात झालेली नाही .
दोन्ही देशांमधील अधिकृत व्यापार स्थगित असताना आयातीमध्ये झालेली ही वाढ विशेष लक्ष वेधून घेत आहे . मात्र ही आकडेवारी बँकांमार्फत झालेल्या आयात पेमेंटची असून प्रत्येक मालाची वाहतूक नेमक्या कोणत्या मार्गाने झाली ,हे सर्प[स्पष्ट होत नाही .
पाकिस्तानकडून भारतातून होणाऱ्या आयातीमधे औषधे आणि सेंद्रिय रसायनांचा मोठा वाटा आहे . पाकिस्तानच्या औषधनिर्मिती उद्योगाला भारतातून मिळणार कच्चा माल महत्वाचा ठरतो . भारतीय औषध उद्योग तुलनेने कमी किमतीत औषध आणि औषध निर्मितीसाठी आवश्यक घटक उपलब्ध करून देतो .
याशिवाय प्लास्टिक , पेट्रोलियम उत्पादने , रंग ,रबर ,चहा ,कॉफी , भाज्या आणि मसाले यासारख्या वस्तूंचाही व्यापार होत असल्याचे दिसते . इतर देशांमधून या वस्तूंची आयात केल्यास वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्च वाढू शकतो . त्यामुळे राजकीय तणाव असूनही व्यावसायिक गरजांमुळे भारतीय उत्पादनाची मागणी कायम असल्याचे चित्र आहे .
भारत आणि पाकिस्तानमधील थेट व्यापार बंद असल्याने भारतीय वस्तू संयुक्त अरब अमिराती ( UAE ) मलेशिया , सिंगापूर यांसारख्या तिसऱ्या देशांमार्फत पाकिस्तानमध्ये पोहोचत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . काही वस्तू आधी तिसऱ्या देशांमध्ये पाठवून तेथून पाकिस्तानला निर्यात केल्या जातात . त्यामुळे मूळ उत्पादक देश आणि माल पाठवण्याचा मार्ग यामध्ये फरक निर्माण होऊ शकतो .
दरम्यान काही विश्लेषकांच्या मते दोन्ही देशांमधील काही अलीकडील सकारात्मक घडामोडी संबंध सुधारण्याचे संकेत देत आहेत . मात्र व्यापाराच्या आकडेवारीवरून राजनैतिक संबंध सुधारल्याचा थेट निष्कर्ष काढता येणार नाही . सुरक्षा आणि दहशदवाद यांचा संबंध आणि त्यावरचे प्रश्न हे कायम असल्याने अधिकृत व्यापार पुन्हा सुरु होण्यासाठी दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे .






