Russia Attack on Ukraine before Trump Zelensky meet
Russia Ukraine War news marathi : मॉस्को/कीव : एक मोठी माहिती समोर आली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला मोठा हल्ला केला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात बैठक होणार आहे. यामध्ये रशिया युक्रेन युद्धवर (Russia Ukraine War) शांतता चर्चा होणार आहे. पण यापूर्वीच रशियाने युक्रेनवर तीव्र हल्ला केला आहे.
झेलेन्स्की यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वॉशिंग्टनमधील शांतता चर्चेपूर्वी रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. झेलेन्स्कींनी म्हटले की, युक्रेन, ब्रिटन, फ्रान्स, इटली, फिनलँड, युरोपियन युनियन आणि नाटोचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत सर्वांना शांतता आणि युक्रेनची सुरक्षितता हवी आहे. पण रशियाने युक्रेनच्या खार्किव्ह, झाप्पोरिझ्झिया, सुमी आणि ओडेसा शहरावर हल्ला केला आहे. येथील पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO
झेलेन्स्की दिलेल्या माहितीनुसार, रशियाने खार्किव्हमध्ये ड्रोन हल्ले केले आहे. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून लहान चिमुकलीचाही जीव गेला आहे. तसेच झापोरिझ्झियामध्ये क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. यामध्ये तीन जणांचा मृत्यू, तर 20 जखमी झाले आहेत.
रशिया युक्रेनवर जाणूनबुजून हल्ला करत असल्याचे आणि विशेष करुन लहान मुलांना लक्ष्य करत असल्याचे झेलेन्स्कींनी म्हटले आहे. युक्रेनच्या शांतता प्रयत्नांना कमकुवत करण्याचा पुतिन यांचा हेतू आहे. हल्ले थांबवण्यासाठी आम्हाला मदतीची आवश्यकता आहे. युद्ध संपणे अत्यंत गरजेचे आहे.
आमच्या देशातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. झेलेन्स्की हल्ल्यात गेलेल्या बळींच्या कुटुंबियांप्रती आणि प्रियजनांप्रती संवदेना व्यक्त केल्या आहे.
आज वॉशिंग्टन येथे व्हाइट हाइमध्ये वोलोडिमिर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या चर्चा होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्या अलास्कामध्ये 15 ऑगस्टला झालेल्या चर्चेनंतर ही बैठक होत आहे. यामध्ये युरोपीय नेते आणि नाटो प्रमुख उपस्थित राहणार आहे. युरोपीय देशांनी युक्रेनला आपला पाठिंबा दर्शवला आहे
FAQs (संबंधित प्रश्न)
रशिया युक्रेन युद्ध कधी सुरु झाले?
रशिया आणि युक्रेन युद्ध २०१४ फ्रेब्रवारी मध्ये सुरु झाले तेव्हापासून आतापर्यंत सुरु आहे.
काय आहे रशिया युक्रेन वादाचे कारण?
रशियाने युक्रेनच्या क्रिमियावर ताबा मिळवल्यापासून या युद्धाला सुरुवात झाली होती. पण त्यानंतर युक्रेनने देखील रशियाच्या डोनेट्स्कवर ताबा मिळवला. यामुळे २०२२ मध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशात आपापला प्रदेश परत मिळवण्यासाठी संघर्ष सुरु झाला.