Russia Ukraine Peace Talk Donald Trump to hold talks with Zelensky today
Ruissa Ukriane Peace Talk : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांची भेट घेणार आहेत. रशिया युक्रेन युद्धावर (Russia Ukraine War) शांतता करारसाठी व्हाइट हाउसमध्ये ही चर्चा होणार आहे. झेलेन्स्की या चर्चेसाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. या चर्चेसाठी युरोपीय देशांच्या प्रतिनिधींचाही समावेश असले. यापूर्वी ट्रम्प रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी शुक्रवारी (१५ ऑगस्ट) युक्रेन युद्धावर चर्चा केली होती. पण या बैठकीत कोणताही ठोस निर्णय लागला नाही.
सोमवारी (१८ ऑगस्ट) वॉशिंग्टन डीसीमध्ये होणाऱ्या ट्रम्प आणि झेलेन्स्कींच्या तचर्चेसाठी युरोपीय देशांचे नेते देखील सहभागी होणार आहे. यामध्ये नाटो प्रमुखांचाही समावेश आहे. या बैठकीसाठी युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन, जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ, फिनिश अध्यक्ष अलेक्झांडर स्टब, फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, नाटोचे सरचिटणीस मार्क रुट, इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर हे नेते उपस्थित राहणार आहे.
या सर्व नेत्यांना रशिया युक्रेनविरुद्धच्या युद्धात युक्रेनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. यापूर्वी शुक्रवारी (१५ ऑगस्ट) रोजी अलास्कामध्ये झालेल्या पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर युरोपीय देश आणि झेलेन्स्कींसोबत व्हिडिओ कॉलद्वारे चर्तचा केली होती.
‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
पुतिन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर रशिया युक्रेन युद्ध थांबू शकते, पण हे पूर्णपण युक्रेनवर अवलंबून आहे. तसेच रशियाने युक्रेनसोमर काही अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य झाल्यास रशिया युद्धबंदीवर विचार करेल असे पुतिन यांनी म्हटले आहे.
रशियाने युक्रेनने पूर्व डोनेट्स्क भागातून सैन्य माघारी घ्यावे अशी मागणी केली आहे. तसेच नाटोचा पूर्वेकडील विस्तार थांबवणे आणि युक्रेनला नाटो देशात सहभागी करुन न घेणे असेही रशियाने म्हटले आहे.
यापूर्वी २०२५ च्या सुरुवातीला जानेवारीच्या अखेरीसही ट्रम्प आणि झेलेन्स्कींची चर्चा झाली होती. यावेळी देखील रशिया आणि युक्रेन युद्धबंदीवर चर्चेचा हेतू होता पण या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला होता. यावेळी ट्रम्प पत्रकार परिषदेत झेलेन्स्कींविरोधात आक्रमक झाले होते. त्यांनी युद्ध संपवण्यासाठी युक्रेनकडे पूर्वेकडील प्रदेश रशियाला सोपवण्याची पुतिन यांची मागणी त्यांना सांगितली होती. परंतु झेलेन्स्कींनी याला नकार दिला होता. यामुळे यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद-विवाद झाला होता. झेलेन्स्की बैठक अर्धवट सोडून निघून गेले होते.
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा