Putin-Trump मध्ये गुप्त डील? अमेरिका-NATO तणावाची युक्रेनला मोजावी लागणार किंमत; झेलेन्स्कींचा वाढलं टेन्शन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Middle East Conflict : मध्यपूर्व धुमसणार? US Iran युद्धात आता ‘या’ बड्या देशाची एन्ट्री, जगभरात खळबळ
सध्या मध्यपूर्वेत अमेरिका-इराण युद्ध (US Iran War) अधिक पेटले आहे. या युद्धात इराणने अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी होर्मुझची खाडी बंद केली आहे. यामुळे जागतिक बाजारात मोठे उर्जा संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नाटो देशांना होर्मुझ स्ट्रेटमध्ये लष्करी मदत पाठवण्याचे आवाहन केले होते. परंतु नाटो देश आणि दक्षिण आशियातील काही मित्रराष्ट्रांनी याला नकार दिला. यामुळे ट्रम्प अत्यंत नाराज आहेत.
दुसरकीडे अमेरिका – नाटोतील तणावामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांची चिंता वाढली आहेत. ट्रम्प आणि पुतिन यांच्या गुप्त डील होण्याची शक्यता आहे. ज्याचा फटका युक्रेनच्या सुरक्षेवर होऊ शकतो. ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स यांसारख्या बलाढ्य NATO राष्ट्रांनी ट्रम्प यांना लष्करी मदत करण्यास नकार दिला. यावर ट्रम्प यांनी संतापून तीव्र टीकाही केली. अमेरिका या देशांचे संरक्षण करतो, पणे हे देश त्याला संकटाच्या काळात साथ देत नाही असे म्हणत त्यांनी टीका केली.
परिणामी ट्रम्प अमेरिका फर्स्ट धोरणाला प्राधान्य देऊ शकता जी युक्रेनसाठी धोक्याची बाब मानली जाते आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने इराण युद्धामुळे आधीच आपली संरक्षण यंत्रणा मध्यपूर्वेकडे वळवली आहे. अशा परिस्थिती नाटोशी वादामुळे अमेरिका युक्रेनची लष्करी मदत अधिक कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ट्रम्प युक्रेनची जाबाबदारी पूर्णपणे नाटो (युरोपीय) देशांवर टाकू शकतात. ज्यामुळे आर्थिक दबाव वाढू शकते.
नाटो आणि ट्रम्पमधील नाराजीचा मोठा फायदा रशिया उचलू शकतो. यामुले रशिया-युक्रेन युद्धा(Russia Ukraine War) त पुतिनचे पारडे जड होऊ शकते. ट्रम्प यांनी यापूर्वीच युक्रेनला रशियाच्या अटी मान्य करुन शांतता प्रस्थापित करण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर युक्रेनला रशियाच्या अटी मान्य कराव्या लागतील. ज्यामध्ये युक्रेनला आपल्या ताब्यातील काही प्रदेश सोडावे लागू शकतात. तसेच युक्रेनच्या नाटोमध्ये प्रवेशाचाही मार्ग कायमचा बंद होऊ शकतो. तसेच रशियावरील निर्बंधही कमी होऊ शकतात.
Ans: ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत अमेरिकेच्या मदतीसाठी नाटो देशांना युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. परंतु सर्व देशांनी याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे ट्रम्प नाटो देशांवर नाराज आहेत.
Ans: ट्रम्प आणि नाटो देशांमधील तणावामुले, अमेरिका युक्रेनची सुरक्षा आणि लष्करी मदत कमी करु शकते. ज्याचा फायदा घेऊन रशिया युक्रेनवर हल्ला करु शकतो. याचा रणनीतिक फायदा घेऊ शकतो.
Ans: ट्रम्प आणि पुतिन यांच्या युक्रेनला काही प्रदेश सोडावे लागू शकतात अशी डील होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे नाटोचे सदस्यत्वही थांबू शकते. रशियावरील निर्बंध कमी होऊ शकतात.






