Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War: रशियाचे युक्रेनच्या निवासी भागांवर प्राणघातक हल्ले; लहान मुलासह 12 जणांचा मृत्यू

रशिया गेल्या तीन दिवसांपासून युक्रेनच्या निवासी स्थांनांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यात एका लहान मुलासह 12 जणांचा मृत्यू झाला आहे.अनेक लोक ढिगाऱ्यांकखाली अडकले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 20, 2024 | 11:23 AM
Russia-Ukraine War: रशियाचे युक्रेनच्या निवासी भागांवर प्राणघातक हल्ले; लहान मुलासह 12 जमांचा मृत्यू

Russia-Ukraine War: रशियाचे युक्रेनच्या निवासी भागांवर प्राणघातक हल्ले; लहान मुलासह 12 जमांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

कीव: रशिया-युक्रेन युद्ध गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. हे युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे. दरम्यान रशियाने युक्रेनवर हल्ले अधिक तीव्र केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशिया गेल्या तीन दिवसांपासून युक्रेनच्या निवासी स्थांनांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यात एका लहान मुलासह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सुमी शहरावर झालेल्या ड्रोन हल्ल्यांत  दोन मुलांसह 11 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्यांकखाली अडकले असल्याची भिती बचाव पथकाने व्यक्त केली आहे.

रशिया सतत ड्रोन हल्ले करत आहे

मीडिया रिपोर्टनुसार, रशियाने काल पहाटे युक्रेनच्या लुखिव शहरातील एका शैक्षणिक ठिकाणांतील वस्तिगृहाला लक्ष्य करत तीव्र हल्ले केले आहेत, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय रशियाने सुमी प्रदेशातील निवासी भागांवरक्लस्टर शस्त्रांनी सुसज्ज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यांत 11 लोक ठार तर 84 लोक जखमी झाले आहेत. यामुळे तेथील नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरलेले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाच्या आण्विक हल्ल्यांच्या धोरणांत बदल; क्षेपणास्त्रांच्या प्रत्युत्तरासाठी वापरणार आण्विक शस्त्रे

पुतिन यांना युद्ध संपवण्यात रस नाही

याशिवाय, युक्रेनच्या दक्षिणेकडील ओडेसा या बंदर शहरामध्ये क्षेपणास्त्रांचे हल्ले केले होते. यामुळे शहरामध्ये एका अपार्टमेंटला आग लागली. या आगीत 10 लोक ठार आणि 43 लोक जखमी झाले. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यांवर संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, सततच्या हवाई हल्ल्यांमुळे हे सिद्ध होते की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध संपवण्यात रस नाही. याशिवाय, व्लादिमिर झेलेन्स्की म्हणाले की, “रशियाचा प्रत्येक हल्ला पुतीनच्या खऱ्या हेतूची पुष्टी करतआहे. यामुळे रशियाला न्याय्य शांततेसाठी भाग पाडले पाहिजे.”

युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्यांचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी- जो बायडेन

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्यांचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली होती. यामुळे रशियाचे अध्यक्ष पुतिन यावर कोणते पाऊल उचलतील असा तेढ निर्माण झाला होता. दरम्यान अध्यक्ष पुतिन यांनी याविरोधात एक मोठी निर्णय घेतला आहे. त्यांनी रशियन सैन्याला युक्रेनविरोधात आण्विक शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या वापराशी संबंधित धोरणांमध्ये हा महत्त्वपूर्णबदल केला आहे. या बदलेल्या नियमांनुसार, जर कोणत्याही देशाने अणुशक्तीच्या सहकार्याने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला कर रशिया देखील अणवस्त्राचा पार करणार असल्याचे ठरले आहे. अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास परवानगी दिल्यानंतर रशियाने हा निर्णय घेतला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताचे GSAT-20 उपग्रह स्पेस एक्सच्या मदतीने यशस्वीरित्या लॉंच; आता विमानांमध्ये इंटनरेट सुविधा उपलब्ध होणार

Web Title: Russia ukraine war russias deadly attacks on residential areas of ukraine nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 11:15 AM

Topics:  

  • America
  • Russia
  • ukraine

संबंधित बातम्या

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
1

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
2

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
3

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.