फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: भारताचे GSAT 20 सर्वात प्रगत उपग्रह आज यशस्विरित्या प्रक्षेपित करण्यात आले. यासाठी भारताने Space X ची मदत घेतली. स्पेस एक्सच्या Falcon 9 रॉकेटच्या मदतीने उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. स्पेस एक्स हे इलॉन मस्क यांच्या मालकीचे आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा केप कॅनवेरल येथून हा उपग्रह प्रक्षेपित करण्याता आला. यामुळे आता भारताला विमानांमध्ये इंटनेट सेवा उप्लब्ध होईल. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
उपग्रहाचे काम काय असेल?
GSAT N-2 हा उपग्रह दुर्गम भागांमध्ये ब्रॉडबँड सेवा आणि प्रवासी विमानांना विमानामध्ये इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी कार्य करणार आहे. हा उपग्रह 32 युजर बीमने सुसज्ज आहे. या उपग्रहामध्ये ईशान्येकडील आठ अरुंद स्पॉट बीम आणि उर्वरित भारतातील 24 रुंद स्पॉट बीम आहेत.
सर्व 32 बीम भारतातील हब स्थानकांवरून समर्थित असेल. तसेच हे उपग्रह विमानात इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी मदत करतील.या उपग्रहाच्या लॉंचिंगचा एक व्हिडिओ देखील स्पेस एक्स ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Deployment of @NSIL_India GSAT-N2 confirmed pic.twitter.com/AHYjp9Zn6S
— SpaceX (@SpaceX) November 18, 2024
भारताने SpaceX ची मदत का घेतली?
मिळालेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन 4700 किलो आहे. तसेच या उपग्रहाचे वजन उचलण्यासाठी त्या योग्य रॉकेट भारताकडे नाही. भरताकडे असलेल्या रॉकेट्सची क्षमता 4700 किलोचे वजन उचलण्याची नसल्याने स्पेसएक्सची मदत घेण्यात आली. भारताकडे असलेले रॉकेट ‘द बाहुबली’ किंवा प्रक्षेपण वाहन मार्क-3 हे अंतराळ कक्षेत जास्तीत जास्त 4000 ते 4100 किलो वजन वाहून नेऊ शकते. तसेच युक्रेनमधील संघर्षामुळे रशिया आपली रॉकेट व्यावसायिक प्रक्षेपणासाठी देऊ शकला नाही.
भारतासाठी हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे
भारताच्या या प्रक्षेपणामुळे Space X आणि ISRO मधील न्यू स्पेस इंडिया लिमिडेडद्वारे महत्त्वाचे पहिले पाऊल उचलले आहे. KA बँड वारंवारता असलेला हा इस्त्रोने बनवलेला पहिला उपग्रह भारताने वापरला आहे. यामुळे भारतातील विविध क्षेत्रांमध्ये ब्रॉडबँड सेवांची कार्यक्षमता आणि व्याप्ती वाढेल असे म्हटले जात आहे.