फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मास्को: रशिया-युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे. गेल्या दीड वर्षापासून हे युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्यांचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली होती. यामुळे रशियाचे अध्यक्ष पुतिन यावर कोणते पाऊल उचलतील असा तेढ निर्माण झाला होता. दरम्यान अध्यक्ष पुतिन यांनी याविरोधात एक मोठी निर्णय घेतला आहे. त्यांनी रशियन सैन्याला युक्रेनविरोधात आण्विक शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या वापराशी संबंधित धोरणांमध्ये हा महत्त्वपूर्णबदल केला आहे. या बदलेल्या नियमांनुसार, जर कोणत्याही देशाने अणुशक्तीच्या सहकार्याने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला कर रशिया देखील अणवस्त्राचा पार करणार असल्याचे ठरले आहे. अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास परवानगी दिल्यानंतर रशियाने हा निर्णय घेतला आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला हजार दिवस पूर्ण
रशिया-युक्रेन युद्धाला हजार दिवस पूर्ण झाल्यानंतर पुतिन यांनी या नवीन धोरणांवर स्वाक्षरी केली. या धोरणात स्पष्ट करण्याता आले आहे की, रशियावर अणुशक्ती क्षेपणास्त्र हल्ला झाल्यास तर रशिया अण्वस्त्रांचा वापर प्रत्युत्तरात करू शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (ATACMS) वापरण्यास मान्यता दिली आहे. ही सिस्टम 300 किमीपर्यंत अचूक हल्ला करू शकते.
जो बायडेन यांच्या क्षेपणास्त्रांच्या निर्णयामुळे रशिया-युक्रेन तणावात वाढ
अमेरिका आणि ब्रिटनने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रांची मदत पुरवल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये अमेरिकेने युक्रेनला ATACMS क्षेपणास्त्रे पुरवली होती, परंतु ती केवळ युक्रेनच्या आत वापरण्याची अट होती. आता ही अट काढून टाकण्यात आली असून युक्रेनला अधिक आक्रमक होण्यास परवानगी मिळाली आहे.
याशिवाय, फ्रान्सने देखील युक्रेनला स्टॉर्म शॅडो नावाची लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिली होती. मात्र तीही मर्यादित वापरासाठी होती. या बदलांमुळे रशियाने आपले अणु धोरण कडक केले आहे. यामुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्याची भिती निर्माण झाली आहे.
नाटोला पुतिन यांचा इशारा
पुतिन यांनी म्हटले की, अमेरिकेच्या उपग्रह आणि तांत्रिक सहाय्याशिवाय युक्रेन या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करू शकत नाही. तसेच नाटोचे प्रशिक्षित जवानच ही शस्त्रे प्रभावीपणे हाताळू शकतात. त्यामुळे, नाटो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या युद्धात सामील होत आहे. यामुळे पुतिन यांनी नाटोला इशारा दिला आहे की, नाटोचे सदस्य युक्रेनच्या बाजून सहभागी झाले तर रशिया कठोर पावले उचलेले. अशा परिस्थितीत तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून जागतिक शांततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.