
Russia says under Humanitarian returns bodies of 1,000 Ukrainian soldiers
मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ युद्ध सुरु आहे. यामध्ये रशिया युक्रेनवर गेल्या काही दिवसांपासून सतत हल्ले करत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाने युक्रेनसोबत एक मोठा करार केल्याचा दावा केला आहे. रशियाच्या द मॉस्को टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने मृत युक्रेनियन सैन्यांच शव परत केले आहे.
रशियन मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या क्रेमलिमनचे सल्लागार आणि शांतता करार वाटाघाटीकार व्लादिमिर मेडिन्सिकी यांनी ही माहिती दिली. व्लादिमिर मेडिन्सिकींनी दावा केला आहे की, इस्तंबूलमध्ये झालेल्या मानवातावादी करारांतर्गत रशियाने युक्रेनच्या १००० सैनिकांचे मृतदेह परत केले आहेत. तर याअंतर्गत युक्रेनने रशियाच्या १९ सैनिकांचे मृतदेह परत केले आहेत. परंतु अद्याप यावर युक्रेनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
मेडिन्स्की यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांमध्ये सध्या लष्करी संघर्ष सुरु आहे. यामध्ये रशियाने मानतावादी पाऊल उचलले आहे. त्यांनी म्हटले की, “आम्हाला आशा की हे सैनिक त्यांच्या मायदेशात सन्मानाने विश्रांती घेऊ शकतील. ते त्यांच्या मायदेशी शांततेत राहो. ”
दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार, मृतहेदांची झालेल्या या देवाणघेवाणीचा करार हा इस्तंबूलमध्ये २०२२ मद्ये करण्यात आला होता. युद्धात बळी गेलेल्या सैनिकांचे मृतदेह सरुक्षित परत करण्याचा उद्देश या मानवतावादी काराराचा होता. दरम्यान या कराराकडे दोन्ही देशांकडून समाजातील एक दुवा म्हणून पाहिले जात आहे. पंरुत अद्यापही दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरुच आहे.
रशिया आणि युक्रेन युद्ध गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर तीव्र हल्ले करत आहे. यामध्ये दोन्ही बाजूंचे हजारो सैनिक मारले आणि नागरिकांचा बळी गेला आहे. या युद्धात युरोपीय देशांचा युक्रेनला पाठिंबा मिळत आहे. रशियावर निर्बंध लादण्याच्या चर्चा देखील सुरु आहेत.
नुकतेच नाटोचे प्रमुख मार्क रुटो यांनी रशियाच्या तेल आणि गॅस उद्योगावर निर्बंध लादणार असल्याचे म्हटले आहे. तसेच याअंतर्गत भारत, चीन, आणि ब्राझील यासांरख्या रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांना देखील १०० टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील रशियाला शांतता करार करण्याचे म्हटले आहे.