Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाचा घातक खेळ सुरु! युक्रेनवर वाढणार विध्वंसक ड्रोन हल्ले; जर्मनच्या अधिकाऱ्याने दिली मोठी माहिती

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धा आता धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच युरोपीय देशांमध्ये भीती पसरली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 21, 2025 | 10:52 AM
Russia's dangerous game begun, Destructive drone attacks on Ukraine will increase says German official

Russia's dangerous game begun, Destructive drone attacks on Ukraine will increase says German official

Follow Us
Close
Follow Us:

Russia Ukraine war news marathi : जेरुसेलम : गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. सध्या रशिया आणि युक्रेन युद्धाने रौद्र रुप धारण केले आहे. रशियाचे युक्रेनवर तीव्र हल्ले सुरु असून आता हे युद्ध धोकादायक टप्प्यावरजवळ येत असल्याची माहिती समोर आली आहे. रशिया युक्रेनवर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. जर्मनीच्या बुंडसवेहरचेमेजर जनरल यांनी ही माहिती दिली आहे.

तसेच युक्रेनच्या समन्वय केंद्राचे प्रमुख क्रिश्चियन फ्रायडिंग यांनी देखील याची पुष्टी केली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशिया युक्रेनवर ड्रोन हल्ल्याची तयारी करत असून एकाच वेळी २ हजार ड्रोन्सचा मार करण्याची शक्यता आहे. हा आतापर्यंतचा रशियाचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असेल. हा हल्ला युक्रेनच्या संरक्षणासाठी मोठे आव्हान ठरु शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भूकंपामुळे हादरली रशियाची जमीन; त्सुनामीचा इशाऱ्याने लोकांमध्ये घबराट, जाणून घ्या काय आहे परिस्थिती?

रशियाच्या ड्रोन उत्पादनात वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने आपल्या ड्रोन उप्तादनात वाढ केली आहे. फ्रायडिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया जवळपास २० लाख FPV ड्रोन्सची निर्मिती करत आहे. या ड्रोनमध्ये लांब अंतरापर्यंत अचूक हल्ला करण्याची श्रमता आहे. यामध्ये सर्वात जास्त कामिकाझी ड्रोनही मोठ्या प्रमाणावर तयार केले जात आहेत.

फ्रायडिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने जून महिन्यात ५ हजार ३३७ शाहीद ड्रोन युक्रेनवर डागले होते. हे ड्रोन इतके ताकदवर होते की या ड्रोन्सने पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टमलाही नष्ट करण्याची क्षमता ठेवतात.

German Major General Christian Freuding, head of the Bundeswehr’s Ukraine Situation Center, stated on the Nachgefragt podcast that Moscow aims to reach the capability of launching 2,000 drones simultaneously against Ukraine. He emphasized that it’s not cost-effective to… pic.twitter.com/XRs8VvdGxC — NSTRIKE (@NSTRIKE1231) July 20, 2025

युक्रेन देखील प्रत्युत्तराच्या तयारीत

सध्या रशियाच्या वाढत्या आक्रमाणाला रोखण्यासाठी युक्रेनने देखील प्रत्युत्तरात्मक कारवाईची तयारी सुरु केली आहे. फ्रायडिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर सुरु केला आहे. यांचा मारा रशियाच्या ड्रोन उत्पादन केंद्रांवर केला जात आहेत. रशियाच्या वेगवेगळ्या भागातील लष्करी उत्पादन केंद्रे, शस्त्र कारखाने आणि ड्रोन असेंब्ली युनिट्सला विशेष करुन लक्ष्य केले जात आहे. परंतु युक्रेनला अधिक ताकदवान आणि लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांची गरज आहे. यासाठी पश्चिमी देशांकडे युक्रेनने मागणी केली आहे.

दरम्यान जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनला मदत केली आहे. जुलै अखेरपर्यंत जर्मनीकडून शेकडो लांब पल्ल्याची देशांतर्गत उत्पादित शस्त्रे युक्रेनला पाठवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनान्ड ट्रम्प यांनी देखील युक्रेनला नाटोच्या माध्यमातून शस्त्रे पुरवण्याचे म्हटले आहे.

सध्या परिस्थिती पाहता, संपूर्ण युरोपीय देशांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताला झटका! चीनचे ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बांधकाम सुरू, बांगलादेशही चिंतेत

Web Title: Russias dangerous game begun destructive drone attacks on ukraine will increase says german official

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Russia
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO
1

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
2

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
3

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही
4

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.