भारताला झटका! चीनचे ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बांधकाम सुरू, बांगलादेशही चिंतेत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिजिंग : एक मोठी बातमी समोर येत आहे. तिबेटमध्ये ब्रम्हपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच याचे भूमिपूरजन देखील करण्यात आले. यासाठी शनिवारी ( १९ जुलै) चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. सरकारी माध्यमांनी याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ मध्येच चीनने या प्रकल्पाला मान्यता दिली होती. तिबेटमध्ये या धरणाला यारलुंग त्सांगपो आणि भारतात ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखले जाते. पंरतु चीनच्या या प्रकल्पाला भारताने विरोध केला आहे.
चीनचा हा सर्वात जगातील सर्वात मोठा वजलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत चीन पाच हायड्रो पावर स्टेशन उभारणार आहे. यासाठी सुमारे १.२ ट्रिलियन युआन म्हणजे सुमारे १६७ अब्ज डॉलर्सचा खर्च होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे तिबेटमध्ये न्यिंगची येथे उत्पादित होणारी वीज मोठ्या प्रमाणात इतर प्रदेशांमध्ये पाठवली जाईल. चीनने दावा केला आहे की हा प्रकल्प कार्बन न्यूट्रल उद्देशांसह तिबेटच्या आर्थिक प्रगतीसाठी मदत करेल. या प्रकल्पातून तयारी होणारी वीज चीनच्या भागांमध्ये वापरली जाईल. तसेच याचा काही भाग स्थानिक गरजांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे चीनने म्हटले आहे.
परंतु या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशातील लाखो लोकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यांगत्से नदीवरील थ्री गॉर्जेस धरणापेक्षाही हे धरण मोठे असू शकते, अशी माहिती शिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे. भारताने चीनच्या या प्रकल्पावर चिंता दर्शवली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या या प्रक्लपामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या कालच्या प्रवाहातील भारतीय राज्यांवर पिरामण होण्याची शक्यत आहे. परंतु चीनने या प्रकल्पामुळे कोणताही नकारात्मक परिमाण होणार नसल्याचे म्हटले आहे.
भारत आणि बांगलादेशच्या ईशान्येकडील राज्यांवर याचा परिमाण होण्याची शक्यता आहे. तसेच या भागांत वारंवार भूंकप होत असतात. यामुळे धरण बांधल्यानंतर परिसंस्थेवर परिणाम होईल. तसेच अनेक अपघातांच्या घटनांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे भूस्खलन, भूकंप आणि पूर अशा समस्या मोठ्या प्रमाणात वाढतील अशी चिंता भारताने व्यक्त केली आहे.
याच वेळी पर्यावरण तज्ज्ञांनी या प्रकल्पांचा पर्यावरणीय परिणामांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तिबेट पठार जैवविविधतेने नटलेले आहे. परंतु हे अतिशय नाजुक क्षेत्र आहे. या भ्यव्य प्रकल्पामुळे येथील परिसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सध्या चीन आणि भारतानध्ये सीमावादा अजूनही तणावपूर्ण आहेच परंतु चीनच्या या प्रकल्पामुळे भारतासोबतचा वाद वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात भू-राजरकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.