Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धडकी भरवणारा रशियाचा नवा डाव! युक्रेनच्या आरोपांमुळे वाढले डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन?

रशिया आणि युक्रेनचे युद्ध अजूनही संपलेले नसताना युक्रेनने रशियावर गंभीर आरोप केला आहे. ज्याने डोनाल्ड ट्रम्प यांचेही टेन्शन वाढले आहे. युक्रेनने रशियावर अण्वस्त्र नियंत्रणाच्या कराराचे उल्लंघन केल्याचा खळबळजनक दावा केला

  • By Priti Hingane
Updated On: Nov 01, 2025 | 07:52 PM
धडकी भरवणारा रशियाचा नवा डाव! युक्रेनच्या आरोपांमुळे वाढले डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन?

धडकी भरवणारा रशियाचा नवा डाव! युक्रेनच्या आरोपांमुळे वाढले डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन?

Follow Us
Close
Follow Us:
  • युक्रेनचा रशियावर खळबळजनक आरोप
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही वाढले टेन्शन
  • रशियाकडून अण्वस्त्र नियंत्रण कराराचे उल्लंघन
Russia vs Ukraine War : रशिया आणि युक्रेनचे युद्ध अजूनही संपलेले नाही. त्यांच्यात युद्ध सुरु असतानाच युक्रेनने रशियावर खळबळजनक आरोप केला आहे. ज्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही टेन्शन वाढले आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेनच्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. मात्र यावर अजूनही काहीच मार्ग निघाला नसून, त्यातल्या त्यात रशियाकडून वारंवार अमेरिकेवर हल्ले सुरू आहे.

हेही वाचा : सौदी अरेबियामध्ये पोलीस अन् गुंडांमध्ये चकमक; गोळी लागून एका भारतीय नागरिकाचा मृत्यू 

रशियाकडून हल्ले सुरु असतानाच रशियाच्या युद्धनीतीचा नवा डाव उघडकीस आला आहे. रशियाच्या या भयावह युद्धनीतीमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. युद्धासंदर्भात रशियाचा आक्रमकपणा उघड होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. याच संदर्भात युक्रेनवर रशियाने काही महिनात सगळ्यात घातक 9M729 मिसाईलचा हल्ला केल्याचा धक्कादायक दावा युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रेई सिबिहा यांनी केला आहे.

युक्रेनचा रशियावर खळबळजनक आरोप

युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रेई सिबिहा यांनी असा दावा केला आहे की, गेल्या काही दिवसांपासून 9M729 या मिसाईलचे हल्ले रशियाकडून करण्यात येत होते. अमेरिकेने 2019 मध्ये या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमुळे INF करारातून माघार घेतली होती.

9M729 क्षेपणास्त्र संबधित करार

एक ग्राऊंड-लॉन्च क्रुझ मिसाईल म्हणून 9M729 याची निर्मिती करण्यात आली. 2500 किमी मिसाईलची रेंज असून हे कोणत्याही युरोपातील भागाला भेदू शकते. त्यामुळे 2019 मध्ये अमेरिकेने याचा विध्वंसक लक्षात घेऊन यावर बंधन घातले होते. तसेच, अशी क्षेपणास्त्र बनवणे म्हणजे अण्वस्त्र नियंत्रण कराराच उल्लंघन केल्याची भूमिका अमेरिकेने घेतली होती. त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार रशियासोबत रद्द करायचा निर्णय घेतला.

रशियाकडून अनेकदा मिसाईल हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाकडून तीन महिन्यात या मिसाईलने जवळपास 23 वेळा हल्ला करण्यात आला. याआधीही 2022 मध्येही हल्ला करण्यात आला. अलीकडेच रशियाच्या 9M729 या क्षेपणास्त्राने युक्रेनमधील एका गावाला लक्ष्य केल्याने त्या हल्ल्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

रशियाच्या युद्धनीतीने वाढले डोनाल्ड ट्रम्पचे टेन्शन

रशियाकडून अण्वस्त्र नियंत्रण कराराचे उल्लंघन झाल्याने सगळ्यांचेच टेन्शन वाढले आहे. डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध थांबवण्याचा प्रयत्न होत असून रशियाच्या या आक्रमक भूमिकेमुळे युक्रेनच नव्हे तर संपूर्ण जगाचीच धडधड वाढली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला विराम कधी लागणार? असाही सवाल अन्य देशांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प आता ‘या’ देशावर नाराज; ख्रिश्चन धर्मासाठी मोठा धोका असल्याचं म्हणत ‘वॉचलिस्ट’मध्ये टाकलं

Web Title: Russias new fighting plan due to ukraines allegations us president donald trumps tension also increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 07:24 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Nuclear missiles
  • Russia
  • ukraine

संबंधित बातम्या

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर
1

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर

Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे
2

Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे

Pharma News : चिनी-भारतीय औषधांमुळे वाढला मृत्यूचा धोका; अमेरिकन सिनेटर ‘Rick Scott’ने दिला सावध राहण्याचा स्पष्ट इशारा
3

Pharma News : चिनी-भारतीय औषधांमुळे वाढला मृत्यूचा धोका; अमेरिकन सिनेटर ‘Rick Scott’ने दिला सावध राहण्याचा स्पष्ट इशारा

डोनाल्ड ट्रम्पचे आवडीचे शस्त्र टॅरिफ; स्वतः मान्य करत वाचला आपल्याच गुन्हांचा पाढा
4

डोनाल्ड ट्रम्पचे आवडीचे शस्त्र टॅरिफ; स्वतः मान्य करत वाचला आपल्याच गुन्हांचा पाढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.