Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? राष्ट्राअध्यक्ष पुतिन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Russia Ukraine War: सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तानवादावर लागले आहे. याच दरम्यान दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी तीन दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2025 | 08:14 PM
Russia's President Vladimir Putin announced a 3 day ceasefire

Russia's President Vladimir Putin announced a 3 day ceasefire

Follow Us
Follow Us:

मॉस्को: सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तानवादावर लागले आहे. याच दरम्यान दुसरीकडे रशियाने युक्रेनच्या ताब्यात असलेला कुर्स्क प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला आहे. हा रशियासाठी मोठा लष्करी विजय मानला जात आहे. मात्र याच्या काही दिवस आधीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासमोर शांतात चर्चेचा प्रस्ताव मांडला होती. तसेच पुतिन यांनी ईस्टर समाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसाच्या युद्धबंदीची घोषणा केली होती. यामुळे रशियाच्या कुर्स्कवरील कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

दरम्यान पुन्हा एकदा रशियाने अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. रशियाच्या क्रेमलिन कार्यालयाने म्हटले आहे की, युक्रेनमध्ये 8 मे ते 10 मे 2025 पर्यंत पूर्णंत युद्धबंदी राहिल. हा निर्णय दुसऱ्या महायुद्धीतील नाझी जर्मनीवरील विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मोहम्मद युनूसची तिरपी चाल; युद्धाची चाहूल लागताच भारताबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

रशियाच्या क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार, युद्धबंदी 8 मे रोजी मध्यरात्रीपासून लागू होईल आणि 10 मे पर्यंत राहिल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष 9 मे रोजी होणाऱ्या विजय दिनानिमित्त मानतावादी कारणास्तव शत्रुत्व पूर्णपणे थांबवणार असल्याचे क्रेमलिनने म्हटले आहे. या काळात पुतिन यांनी कोणतीही लष्करी कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सध्या युक्रेनसाठी रशियाचा हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे.

ईस्टरला 30 तासांच्या युद्धबंदीची घोषणा

यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ईस्टर सणाच्या निमित्ताने 30 तासांच्या युद्धबंदीची घोषणा केली होती. यावेळी रशियन सैन्याला युक्रेनमध्ये लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याचत आले होते. तसेच युक्रेन देखील या आदेशचा पालन करेल असे सांगितले होते. याच वेळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धबंदीच्या प्रस्ताव स्वीकरला होता. परंतु तरीही रशियन सैन्याने यूक्रेनवर हल्ला केला होता.

शांतता करारात अमेरिकेची मध्यस्थी

सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता करार घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे,. ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी अनेकवेळा चर्चा केली आहे. परंतु ही चर्चा अयशस्वी राहिली आहे. रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरु आहे.

ट्रम्प झेलेन्स्की भेट

याच दरम्यान पोप यांच्या अत्यंसंस्काराला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की देखील उपस्थित होते. यादरम्यान त्यानी व्हॅटिकन सिटीमध्ये भेट घेतली. व्हाईट हाउसमधील जोरदार वादाविवादानंतर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची ही पहिलीच भेट होती. या बैठकीदरम्यान झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु दोन्ही नेत्यांनी जवळपास 15 मिनिटे चर्चा केली. तसेच यावेळी केवळ ट्रम्प आणि झेलेन्स्की उपस्थित होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युरोपमध्ये बॅल्कआऊट…, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमानसेवेपासून मेट्रोपर्यंत सर्व ठप्प

Web Title: Russias president vladimir putin announced a 3 day ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 08:14 PM

Topics:  

  • Russia
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

US Midterm Elections 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा; रिपब्लिकन जिंकल्यास प्रत्येक अमेरिकनाला मिळणार 5,000 डॉलर्स
1

US Midterm Elections 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा; रिपब्लिकन जिंकल्यास प्रत्येक अमेरिकनाला मिळणार 5,000 डॉलर्स

Eucalyptus : भारत ते लॅटिन अमेरिका… निलगिरीची झाडे बनली जगाची डोकेदुखी; जगात भूजल पातळी आली धडाधड खाली
2

Eucalyptus : भारत ते लॅटिन अमेरिका… निलगिरीची झाडे बनली जगाची डोकेदुखी; जगात भूजल पातळी आली धडाधड खाली

Sindh Division : पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे विभाजन होणार? लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या योजनेवर भडकले बिलावल भुट्टो-झरदारी
3

Sindh Division : पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे विभाजन होणार? लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या योजनेवर भडकले बिलावल भुट्टो-झरदारी

UK Israel Sanctions: वेस्ट बँक वादात इस्रायल आक्रमक! ब्रिटनविरोधात घेतले 4 मोठे कठोर निर्णय; राजनैतिक वर्तुळात खळबळ
4

UK Israel Sanctions: वेस्ट बँक वादात इस्रायल आक्रमक! ब्रिटनविरोधात घेतले 4 मोठे कठोर निर्णय; राजनैतिक वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.