युरोपमध्ये बॅल्कआऊट..., फ्रान्ससह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमानसेवेपासून मेट्रोपर्यंत सर्व ठप्प (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
युरोपमध्ये गंभीर वीजसंकट निर्माण झाले आहे. युरोपच्या स्पेन, फ्रान्स आणि पोर्तुगालसह अनेक देशांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे हवाई सेवांपासून मेट्रोसेवांपर्यंत सर्व काही बंद पडले आहे. लोकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. यापूर्वी माद्रिद ते लिस्बन पर्यंत देखील मोठा भाग अंधारात बुडाला होता. या आपात्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रोटोकॉल लागू केले आहे. सध्या या ब्लॅकआऊट मागीवल कारणाचा शोध घेतला जात आहे. हा सायबर हल्ला असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्पेनच्या राष्ट्रीय ग्रिड ऑपरेशन रेड इलेक्ट्रिका ने यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात, देशभरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वीज कंपन्यांच्या सहकार्याने ठोस पावले उचलण्यात आली आहेत, असे म्हटले आहे. तसेच पोर्तुगालच्या ग्रिड ऑपरेटर इ-रेडसने जारी केलेल्या निवेदनानुसार, युरोपियन पॉवर ग्रिडमधील समस्येमुळे हे संकट उद्भवले असल्याचे म्हटेल आहे. प्राथमिक तपासानुसार, कमी व्होटेजमुळे वीज पुरवठा खंडित झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने ट्रॅफिक लाईट्स बंद पडल्या आहेत. यामुळे बस, मेट्रो सेवांच्या कामकाजावर परिणा झाला आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला आहे. तसेच रुग्णलयांमध्येही अत्यावश्यक बॅकअप जरेटरच्या मदतीने सेवा सुरु आहे. याशिवा, विमानसेवांच्या कामकाजांवरही परिणाम झाला आहे. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना संगणक बंद करण्याल सांगितले आहेत. तसे वीज वाचवण्यासाठी इतर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
सध्या हे संकट किती काळ राहिल हे स्पष्ट नसल्यामुळे लोकांना सहकार्य करण्याचे आवाहान करण्यात आले आहे. या परिस्थीतील हातळण्यासाठी स्पेनमध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती स्थाप करण्यात आली आहे.
दरम्यान स्पेनच्या अधिकाऱ्यांनी, ब्लॅकआऊटचे कारण अद्याप स्पष्ट झाले नीही, परंतु हा सायबर हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सध्या याची चौकशी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यापूर्वी तांत्रिक बिघाडामुशे युरोपमध्ये मोठे ब्लॅकआउट झाले होते.
2003 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये एका झाडामुळे वीज तार तुटली होती आणि यामुळे संपूर्ण इटलीत बीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे यावेळीही तांत्रिक समस्या किंवा सायबर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्पॅनिश प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना, आपत्कालीन सेवांना अनावश्यक कॉल टाळण्याचे निर्देश दिले आहेत. युरोपियन कमिशनने गेल्या अनेक वर्षापासून उर्जा प्रणालीच्या एकत्रीकरणावर भर दिली आहे. परंतु यामुळे प्रगती मंद झाली असल्याचे म्हटले जात आहे.