Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Oman Ties: S. Jaishankar यांचा कुवेत-ओमान दौरा; संरक्षण आणि सागरी सुरक्षेवर झाले एकमत, न्यूयॉर्कमध्ये दिसणार भारतीय सैन्य

Jaishankar Oman Kuwait Visit: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कुवेत आणि ओमानच्या दौऱ्यांद्वारे संरक्षण, ऊर्जा आणि व्यापारी संबंधांना नव्या उंचीवर नेले आहे. आता ते न्यूयॉर्कमध्ये भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मोहिमेचा शुभारंभ करतील.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 10, 2026 | 12:10 PM
s jaishankar kuwait oman visit india unsc campaign new york

s jaishankar kuwait oman visit india unsc campaign new york

Follow Us
Follow Us:
  • परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कुवेत आणि ओमानचा यशस्वी दौरा करून संरक्षण, ऊर्जा सुरक्षा आणि सागरी सुरक्षेबाबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत केले.
  • आखाती देशांच्या दौऱ्यानंतर जयशंकर १३ जुलै रोजी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) २०२८-२९ च्या कार्यकाळासाठी भारताच्या अधिकृत प्रचार मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत.
  • यानंतर १४-१५ जुलै रोजी ते ब्रुसेल्समध्ये भारत-युरोपियन युनियन (EU) व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या तिसऱ्या बैठकीत सहभागी होऊन धोरणात्मक चर्चा करतील.

S Jaishankar Kuwait Oman Visit : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S.Jaishankar) यांनी नुकताच कुवेत आणि ओमानचा आपला महत्त्वपूर्ण दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या दौऱ्यामुळे भारताचे पश्चिम आशियाई देशांसोबतचे संरक्षण, ऊर्जा आणि व्यापारी संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. सध्याच्या बदलत्या जागतिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारताची सागरी सुरक्षा आणि धोरणात्मक हितसंबंध वाढवण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

ओमानमध्ये भव्य स्वागत आणि सागरी सुरक्षेवर चर्चा

कुवेत मधील आपला दौरा आटोपून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे ओमानमध्ये आगमन झाले. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्करी यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. जयशंकर यांनी या आदरातिथ्याबद्दल सोशल मीडियावरून ओमान सरकारचे आभार मानले. ऊर्जा सुरक्षा आणि सागरी व्यापाराच्या दृष्टीने ओमान हा भारताचा अत्यंत विश्वासू भागीदार आहे. उभय देशांमध्ये सागरी मार्गांची सुरक्षा आणि व्यापारी सहकार्य वाढवण्यावर सकारात्मक चर्चा झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : FIFA: फुटबॉल चाहते संतप्त! फ्रान्सकडून मोरोक्कोचा पराभव झाल्यानंतर लंडनमध्ये उसळला हिंसाचार, पाहा VIRAL VIDEO

कुवेतसोबत संरक्षण आणि भारतीय समुदायाच्या सुरक्षेवर मोठा करार

ओमानला जाण्यापूर्वी एस. जयशंकर यांनी कुवेतमध्ये उच्चस्तरीय बैठका घेतल्या. त्यांनी कुवेतचे पंतप्रधान शेख अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची बैठक कुवेतचे संरक्षण मंत्री अब्दुल्ला अली अब्दुल्ला अल-सलेम अल-सबा यांच्यासोबत झाली. या बैठकीत संरक्षण उद्योग आणि सागरी सुरक्षा (Maritime Security) मधील सहकार्य वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. आखाती देशांमधील सध्याचा संघर्ष पाहता, व्यापारी जहाजांच्या सुरक्षिततेसाठी भारताने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय, कुवैती परराष्ट्र मंत्री शेख जर्राह जाबेर अल-अहमद अल-सबाह यांच्याशी झालेल्या चर्चेत जयशंकर यांनी तेथील मोठ्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल कुवेत सरकारचे आभार मानले. ऊर्जा, गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा आणि आरोग्य क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावरही यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Completed a productive visit to Kuwait. A glimpse. 🇮🇳 🇰🇼 pic.twitter.com/KNMCw0E4Nj — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 9, 2026

credit – social media and Twitter

आता लक्ष्य न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची मोहीम

आखाती देशांचा हा दौरा संपवून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर थेट न्यूयॉर्कसाठी रवाना होतील. १३ जुलै रोजी ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) २०२८-२९ च्या कार्यकाळासाठी भारताच्या अधिकृत प्रचार मोहिमेचा (UNSC Campaign) शुभारंभ करतील. जागतिक स्तरावर भारताचे वाढते वजन आणि सैन्याची भूमिका या मोहिमेद्वारे जगासमोर मांडली जाईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iron Dome India: भारताचे संरक्षण कवच आणखी मजबूत; इस्रायलची ‘Rafael’ कंपनी भारतात सुरू करणार ‘आयर्न डोम’ प्रोजेक्ट

भारत-EU व्यापार परिषदेसाठी ब्रुसेल्स दौरा

न्यूयॉर्कमधील मोहीम फत्ते केल्यानंतर, १४-१५ जुलै रोजी जयशंकर ब्रुसेल्सला भेट देतील. तिथे ते भारत-युरोपियन युनियन (EU) व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या तिसऱ्या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत युरोपियन युनियन आणि बेल्जियमच्या समकक्षांसोबत प्रगत तंत्रज्ञान, व्यापार आणि उदयोन्मुख जागतिक आव्हानांवर धोरणात्मक चर्चा केली जाईल. एस. जयशंकर यांचा हा बहुराष्ट्रीय दौरा भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे.

Web Title: S jaishankar kuwait oman visit india unsc campaign new york

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • S.Jaishankar News
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
1

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Nigeria Boat Accident: नायजेरियाच्या सोकोटो राज्यात भीषण बोट अपघात; 47 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये महिला अन् बालक
2

Nigeria Boat Accident: नायजेरियाच्या सोकोटो राज्यात भीषण बोट अपघात; 47 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये महिला अन् बालक

Somalia Ship Hijack: 6 भारतीयांसह 10 खलाशी ओलीस; सोमाली चाच्यांनी पळवले शस्त्रास्त्रांनी भरलेले तुर्की जहाज
3

Somalia Ship Hijack: 6 भारतीयांसह 10 खलाशी ओलीस; सोमाली चाच्यांनी पळवले शस्त्रास्त्रांनी भरलेले तुर्की जहाज

Alaska Plane Crash: अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; 2 वैमानिकांसह सर्व 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू
4

Alaska Plane Crash: अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; 2 वैमानिकांसह सर्व 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.