S. Jaishankar Foreign Visit : अमेरिका-इराण तणाव की होताचा भारत अॅक्टिव्ह झाला आहे. भारताने कूटनीतिक हालचालींनी वेग दिला असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर १० दिवसांच्या सहा देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
जागतिक स्तरावर भारताची मोठी कूटनीतिक हालचाल
परराष्ट्र मंत्री S. Jaishankr या सहा देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर
अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
S. Jaishankar Foreign Visit : नवी दिल्ली : अमेरिका-इराण तणाव काहीसा कमी झाला आहे. याच वेळी दुसरीकडे भारताच्या कुटनीतिक हालचालींना वेग आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ०५ जुलैपासून सहा देशांच्या १० दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करणार आहे. मात्र, या दौऱ्याने चीन-पाकिस्तानची झोप उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एस. जयशंकर या दौऱ्यात कुवेत, बहरीन, कतार, ओमान, अमेरिका आणि बेल्जियम या सहा देशांना भेट देणार आहेत.
जाहिरात
जाहिरात
दौऱ्याचा पहिला टप्पा
या दौऱ्याचा पहिला टप्पा पश्चिम आशियातील देशांचा आहे. ५ ते १० जुलैदरम्यान जशंकर कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानमध्ये विविध बैठका घेतील.
यावेळी उर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या देशांसोबत आर्थिक आणि धोरमात्कम संबंध दृढ करण्याचा प्रयत्न आहे.
दुसरा टप्पा
यानंतर दुसऱ्या टप्प्यात ते अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे जाणार आहेत. येथे ते १३ जुलै रोजी होणार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत २०२८-२९ च्या कालवधीसाठी भारताच्या उमेदवारी मोहिमेला सुरुवात करणार आहेत.
जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक मजबूत करण्याचा या दौऱ्याचा उद्देश आहे. यामुळे हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जाता आहे.
शेवटचा टप्पा
या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात १४ आणि १५ जुलै रोजी ते बेल्जियमला भेट देतील. यावेळी जयशंकर बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे होणाऱ्या भारत-युरोपियन संघ (EU) व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेत सहभागी होतील.
या परिषदेत व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सहकार्य आणि भविष्यातील आर्थिक संधीवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
दौऱ्याचे महत्त्व
हा दौरा केवळ राजनैतिक संबंध मजबूत करण्यापूरता मर्यादित नसून उर्जा, व्यापार, आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने होत आहे. बदलत्या जागितक परिस्थिती भारत विविध देशांसोबतचे व्यापारी आणि आर्थिक संबंध मजबूत करत आहे. जयशंकर यांचा हा दौरा भारताच्या दीर्घकालीन परराष्ट्र आणि आर्धिक धोरणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.