Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण

S. Jaishankar UNGA Speech : संयुक्त राष्ट्र महासभेचा उच्चस्तरीय सप्ताह 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान चालणार आहे. या काळात अनेक देशांचे सर्वोच्च नेते जागतिक शांतता आणि आर्थिक आव्हानांवर चर्चा करतील.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 21, 2026 | 12:00 PM
S Jaishankar UNGA speech,UNGA 81st session updates

S Jaishankar UNGA speech,UNGA 81st session updates

Follow Us
Follow Us:
  • भारताचे प्रतिनिधित्व
  • जागतिक आव्हानांवर मंथन
  • ऐतिहासिक महासत्राची पार्श्वभूमी

जागतिक पातळीवर वाढता भू-राजकीय तणाव, मध्य पूर्वेतील संकट आणि आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे लक्ष न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ८१ व्या अधिवेशनाकडे लागले आहे. २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान आयोजित या उच्चस्तरीय सप्ताहात जगभरातील प्रमुख देशांचे राष्ट्रप्रमुख आणि मुत्सद्दी एकत्र येत आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर न्यूयॉर्कला रवाना होत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, एस. जयशंकर (S. Jaishankar UNGA Speech) २६ सप्टेंबर रोजी महासभेच्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करतील आणि जागतिक मंचावर भारताचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्टपणे मांडतील.

या दौऱ्यात परराष्ट्र मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ असणार आहे. २६ सप्टेंबरच्या मुख्य भाषणाव्यतिरिक्त एस. जयशंकर अनेक बहुपक्षीय (Multilateral) आणि द्विपक्षीय (Bilateral) बैठकांमध्ये भाग घेतील. सध्या जगात अन्नधान्य आणि ऊर्जेच्या किमतींमुळे निर्माण झालेला आर्थिक ताण, हवामान बदलाचे संकट आणि विविध देशांमधील सैनिकी संघर्षांच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका अत्यंत निर्णायक मानली जात आहे. भारताने कायमच संवाद, मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा पुरस्कार केला आहे, त्यामुळे एस. जयशंकर यांच्या या भाषणाकडे जागतिक समुदायाचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

जागतिक शांतता, हवामान बदल आणि सुरक्षेवर महामंथन

संयुक्त राष्ट्र महासभेचा हा उच्चस्तरीय सप्ताह २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. यामध्ये सर्वसाधारण चर्चा २२ ते २६ सप्टेंबर आणि त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी आयोजित केली जाईल. महासभेच्या प्रतिष्ठित हिरव्या संगमरवरी व्यासपीठावरून (Green Marble Podium) संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि वरिष्ठ मुत्सद्दी जगापुढील ज्वलंत प्रश्नांवर आपली मते मांडतील. यंदाच्या अजेंड्यावर जागतिक शांतता आणि सुरक्षा, ढासळती आर्थिक व्यवस्था, समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे निर्माण झालेला धोका, महामारी प्रतिबंधक उपाययोजना आणि अणुशस्त्रांचे संपूर्ण निर्मूलन यांसारखे संवेदनशील विषय अग्रक्रमावर आहेत.

Soon, world leaders will gather here at the @UN General Assembly to find solutions to the world’s most pressing challenges. This is my last #UNGA as Secretary-General and my message is clear: We need international dialogue, cooperation and collective action — now more than ever.… pic.twitter.com/v3vs2XCgXz — António Guterres (@antonioguterres) September 20, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : National Chai Day: केवळ पेय नाही तर भावना! राजघराण्यांपासून गल्लीबोळातील टपरीपर्यंत ‘असा’ आहे आपल्या लाडक्या चहाचा रंजक इतिहास

महासभेच्या या ८१ व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान भूषवणार आहेत. याशिवाय जागतिक राजकारणातील अनेक बडे नेते या अधिवेशनात सक्रिय सहभाग नोंदवतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महासभेत दोन दिवस घालवणार असून, या काळात ते युक्रेन आणि युनायटेड किंगडमच्या नेत्यांसोबत तसेच न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्यासह प्रमुख राजकीय व्यक्तींशी द्विपक्षीय चर्चा करतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर

महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे अंतिम सत्र आणि शांततेचे आवाहन

हे ८१ वे अधिवेशन अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. सध्याचे संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचा कार्यकाळ चालू वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे महासचिव म्हणून हे त्यांचे अंतिम उच्चस्तरीय अधिवेशन असेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अँटोनियो गुटेरेस यांनी एक विशेष व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यामध्ये त्यांनी जगातील सर्व नेत्यांना मतभेद विसरून शांतता, मानवी सन्मान, न्याय आणि मानवतेसाठी एकत्र येण्याचे आग्रही आवाहन केले आहे.

गुटेरेस यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले की, सध्या जग ज्या अभूतपूर्व आव्हानांना तोंड देत आहे, त्यावर मात करण्यासाठी केवळ आंतरराष्ट्रीय सहकार्य, मोकळा संवाद आणि सामूहिक कृती हाच एकमेव मार्ग आहे. जागतिक शांतता प्रस्थापित करणे आणि अन्न व ऊर्जेच्या तुटवड्यामुळे होरपळणाऱ्या विकसनशील देशांना दिलासा देणे ही सर्व राष्ट्रांची सामायिक जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर होणारे हे अधिवेशन जगाला नव्या दिशेने नेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Web Title: S jaishankar to address 81st session of un general assembly in new york

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • India news
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे
1

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?
2

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.