Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Violence: ‘बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा अंतरिम सरकारची जबाबदारी’; अमेरिकन संसंदचे वक्तव्य

बांगलादेशातील हिंदूवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे देशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान अमेरिकन संसंदेचे यावर एक मोठे वक्तव्य समोर आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 04, 2024 | 04:27 PM
Bangladesh Violence: 'बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा अंतरिम सरकारची जबाबदारी'; अमेरिकन संसंदचे वक्तव्य

Bangladesh Violence: 'बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा अंतरिम सरकारची जबाबदारी'; अमेरिकन संसंदचे वक्तव्य

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: बांगलादेशातील हिंदूवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे देशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान अमेरिकन संसंदेचे यावर एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि भारताने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने ठामपणे व्यक्त केले आहे की, धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचा आदर करण्याची गरज आहे.

मौलिक स्वातंत्र्याचा सन्मान- प्रत्येक देशाचे दायित्व

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, “मौलिक स्वातंत्र्याचा सन्मान हे प्रत्येक देशाच्या सरकारचे मुख्य दायित्व आहे. सरकारांनी कायद्याचा आदर करावा आणि मानवी हक्कांची अंमलबजावणी करावी.” त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोणतेही आंदोलन शांततापूर्ण असावे. आंदोलकांना त्यांचे प्रतिनिधित्व आणि न्याय मिळावा, तसेच त्यांच्याशी मानवी हक्कांच्या चौकटीत वागावे, ही अमेरिकेची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिख घडामोडी संबंधित बातम्या- ‘कॅनडा होणार अमेरिकेचा भाग…’; ट्रम्प यांचा जस्टिन ट्रुडोंना सल्ला, नेमकं प्रकरण काय?

हिंसांचार थांबवण्यासाठी प्रशासनाने भूमिका बजावली पाहिजे

दरम्यान अमेरिकेन कॉंग्रेस सदस्य ब्रॅड शरमन यांनीही बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “बांगलादेशातील अंतरिम सरकारवर हिंदू अल्पसंख्यकांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी आहे. अलीकडील हल्ले आणि अत्याचारांमुळे उद्भवलेल्या विरोध आंदोलनांचा सरकारने सकारात्मक तोडगा काढला पाहिजे.” हिंदू समुदायाविरुद्ध होत असलेल्या हिंसेला थांबवण्यात प्रशासनाने निर्णायक भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

बायडेन प्रशासनाला आवाहन

‘हिंदूएक्शन’ संस्थेचे कार्यकारी संचालक उत्सव चक्रवर्ती यांनी बाइडेन प्रशासनाला आवाहन केले की, बांगलादेशातील हिंदूंविरुद्ध होणारी कट्टरपंथीय हिंसा रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. त्यांनी असा दावा केला की, “बांगलादेशातून मिळणाऱ्या माहितीनुसार, हिरासत घेतलेल्या संत व नागरिक अधिकार कार्यकर्ता चिन्मय कृष्ण दास यांच्या जीवनाला गंभीर धोका आहे.” भारतानेही धार्मिक अल्पसंख्यकांवरील हिंसा हा जागतिक मानवी हक्कांचा भंग असल्याचे भारताने ठामपणे म्हटले आहे.

जागतिक स्तरावर प्रयत्नांची गरज

या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित प्रयत्न करावेत, अशीही मागणी केली जात आहे. हिंदू अल्पसंख्यकांच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त बांगलादेश सरकारची नाही तर जागतिक स्तरावरही ती महत्त्वाची ठरत आहे. हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलली गेली नाहीत, तर धार्मिक हिंसा वाढण्याचा धोका निर्माण होईल असे तज्ञांनी म्हटले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने ठोस उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत असे म्हटले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तालिबानचा आणखी एक तानाशाही निर्णय; महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यापासून बंदी

Web Title: Safety of hindus in bangladesh is the responsibility of the interim government says us nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 04:27 PM

Topics:  

  • America
  • Bangladesh
  • india

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी
3

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.