फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांपूर्वी एक मोठी घोषणा केली होती. ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीन या तीन देशांवर कठोर शुल्क लावणार असल्याचे म्हटले होते. विशेष करुन कॅनडातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर 25% शुल्क लादला होता. त्यांनतर या विषयावरील वाद सोडवण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी फ्लोरिडामधील मार-ए-लागो येथे ट्रम्प यांची भेट घेतली होती.
मात्र, यावेळी ट्रम्प यांनी कॅनडाच्या व्यापार धोरणांवर टीका करत, जर कॅनडाने अमेरिकेशी व्यापारातील तफावत दूर केली नाही, तर अमेरिकेचा भाग बनण्याचा विचार करावा, असा सल्ला ट्रुडोंना सुचवले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचा 51 वा राज्य होण्याचा सल्ला दिल्याने दोन्ही देशांमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. यावर ट्रुडो काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ट्रम्प यांचा प्रस्ताव
ट्रम्प यांनी कॅनडातून येणाऱ्या वस्तूंवर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांनी कॅनडाला म्हटले होते की, कॅनडामुळे अमेरिकेला वार्षिक 100 बिलियन डॉलर्सचा तोटा होत आहे. तर, याला उत्तर देताना ट्रूडो यांनी हे टॅरिफ कॅनडाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरेल, यामुळे कॅनडाची संपूर्ण अर्थव्यवस्था नष्ट होईल असे सांगितले. परंतु ट्रंप यांच्या वक्तव्यामुळे कॅनडातील लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कॅनडाची भूमिका
कॅनडा हा अमेरिकेचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापार भागीदार आहे. कॅनडा अमेरिकेला मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल्स, कृषी उत्पादनं आणि ऊर्जा निर्यात करतो. मात्र, ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कॅनडाच्या लोकांनी आणि नेत्यांनी नेहमीच स्वातंत्र्याला महत्व दिले आहे.यापूर्वी कॅनडाने अमेरिकेशी NAFTA (आता USMCA) सारख्या व्यापार नफ्याचे संरक्षण करण्यासाठी करार केले आहेत.
याशिवाय ट्रम्प यांनी कॅनडाच्या निर्वासित आणि स्थालांतरितांच्या उदारमतवादी धोरणावर देखील टिका केली आहे. यामुळे अमेरिकेची सीमा सुरक्षा धोक्यात येऊ शकते असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. तर कॅनडाने इमिग्रेशनला राष्ट्रीय ओळखीचा एक भाग मानत कायमच इमिग्रेशन आणि मानवी हक्कांसाठी कठोर भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांचे हे विधान कॅनडाच्या सार्वभौमत्वावर हल्ला मानले जात आहे.
कॅनडा अमेरिकेचे 51 वां भाग बनण्याचा विचार करेल का?
कॅनडा हा 1867 पासून स्वतंत्र राष्ट्र असून, त्याची राजकीय आणि सांस्कृतिक ओळख अमेरिकेपेक्षा वेगळी आहे. देशाची राजकीय प्रणाली, ब्रिटिश राजेशाहीप्रति निष्ठा, आणि स्वातंत्र्यपूर्ण धोरणे अमेरिकेपासून वेगळी आहेत. यामुळे कॅनडाच्या जनतेला ट्रम्प यांचा प्रस्ताव मान्य नाही.
कॅनडासाठी अमेरिकेचा 51 वा राज्य होण्याचा प्रस्ताव हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय अस्मितेच्या विरोधात आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारातील समस्या सोडवण्यासाठी सहकार्य गरजेचे असले तरीही, कॅनडाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करण्याचा कोणताही निर्णय कॅनडाच्या नागरिकांसाठी अमान्य आहे.