
pentagon claims 108000 us troops deployed across160 countries iran israel war
US military deployment worldwide March 2026 : मध्यपूर्वेतील (Middle East Crisis) रणसंग्राम शिगेला पोहोचला असतानाच, अमेरिकन लष्करी मुख्यालयाने (पेंटागॉन-Pentagon) आपल्या जागतिक लष्करी ताकदीचा सर्वात मोठा आकडा जाहीर केला आहे. अमेरिकन सैन्याचे उपप्रमुख जनरल क्रिस्टोफर लानेव्ह यांनी सिनेट समोर दिलेल्या साक्षीत खळबळजनक खुलासा केला की, सध्या जगातील तब्बल १६० देशांमध्ये १,०८,००० हून अधिक अमेरिकन सैनिक तैनात आहेत. इराणसोबत सुरू असलेल्या थेट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने केवळ मध्यपूर्वेच नव्हे, तर संपूर्ण जगाला ‘लष्करी वेढा’ घातल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
मध्यपूर्वेत तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यासाठी सध्याचे वातावरण अत्यंत गुंतागुंतीचे आणि धोकादायक बनले आहे. जनरल लानेव्ह यांच्या मते, अमेरिकन सैन्य केवळ स्वसंरक्षण करत नाहीये, तर इराण आणि त्याच्या ‘प्रॉक्सी’ संघटनांकडून (हिजबुल्लाह, हमास, हुथी) येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स हवेतच नष्ट करून मित्र राष्ट्रांचे रक्षण करत आहे. इंधन, दारूगोळा आणि वैद्यकीय मदतीचा अखंड पुरवठा सुरू ठेवून अमेरिकेने या युद्धक्षेत्रात आपली पकड घट्ट केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’
इराणशी युद्ध सुरू असतानाही अमेरिकेने चीनकडे दुर्लक्ष केलेले नाही. नौदल ऑपरेशन्सचे उपप्रमुख ॲडमिरल जेम्स किल्बी यांनी स्पष्ट केले की, अमेरिकन नौदलाची ८० टक्के जहाजे, विमाने आणि पाणबुड्या कोणत्याही क्षणी युद्धासाठी सज्ज ठेवण्याचे ध्येय आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या कारवायांना रोखण्यासाठी अमेरिकन नौदल इंडो-पॅसिफिक प्रदेशात प्रचंड सक्रिय झाले आहे. दुसरीकडे, हवाई दल दरवर्षी १,५०० नवीन वैमानिकांना प्रशिक्षण देत असून ‘बी-२१ बॉम्बर’ सारखी महाविनाशक विमाने युद्धासाठी सज्ज ठेवत आहे.
🚨🇺🇸 LIVE UPDATE The U.S. has now deployed more forces to the Middle East than during the First Gulf War, Second Gulf War, and the Iraq War — combined. In just 36 hours, Washington positioned its 12th C-17 Globemaster at bases encircling Iran 🇮🇷.
Each aircraft can haul up to 77… pic.twitter.com/hj4uGVobZ3 — WAR (@warsurv) January 22, 2026
credit – social media and Twitter
आधुनिक युद्ध आता केवळ जमिनीवर किंवा समुद्रात उरलेले नाही. स्पेस फोर्सचे अधिकारी जनरल मायकेल ग्वेटलिन यांनी सांगितले की, उपग्रहांद्वारे शत्रूच्या क्षेपणास्त्रांची पूर्वसूचना मिळवणे आणि नेव्हिगेशन करणे आता अनिवार्य झाले आहे. तर दुसरीकडे, मरीन कॉर्प्सने जगाच्या कोणत्याही भागात, विशेषतः चीनच्या उंबरठ्यावर त्वरित उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे. हे ‘रॅपिड रिस्पॉन्स फोर्स’ अमेरिकेच्या जागतिक रणनीतीचा मुख्य आधार बनले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Doomsday Missile: जगाच्या अंतासाठी एकच मिनिट पुरेसा! अमेरिकेने केली हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट जास्त घातक क्षेपणास्त्र चाचणी
एकीकडे पेंटागॉन आपली ताकद मिरवत असताना, सरकारी जबाबदारी कार्यालयाने (GAO) आरसा दाखवला आहे. डायना मौरर यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याला जुनी शस्त्रे, दुरुस्तीमधील विलंब आणि सुट्या भागांची टंचाई यांसारख्या अंतर्गत समस्यांचा सामना करावा लागत आहे. जर या तांत्रिक अडचणी दूर झाल्या नाहीत, तर जगातील सर्वात बलाढ्य सैन्य असूनही ऐन युद्धाच्या वेळी तयारीवर परिणाम होऊ शकतो. एकूणच, १६० देशांमधील ही तैनाती इराण आणि चीनसाठी एक स्पष्ट इशारा आहे की, अमेरिका कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही आघाडीवर युद्ध लढण्यासाठी सज्ज आहे.
Ans: अमेरिकेने जागतिक स्तरावर १६० देशांमध्ये आपले १,०८,००० हून अधिक सैन्य तैनात केले आहे.
Ans: इराण आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडून होणारे हल्ले रोखणे, मित्र राष्ट्रांचे रक्षण करणे आणि इंडो-पॅसिफिकमध्ये चीनवर नियंत्रण ठेवणे हा मुख्य उद्देश आहे.
Ans: शस्त्रे जुनी होणे, दुरुस्तीमधील विलंब आणि सुट्या भागांची कमतरता यांसारख्या समस्यांमुळे लष्करी तयारीवर परिणाम होत असल्याचे GAO ने म्हटले आहे.