
Mecca Drone Attack Houthi Drone Saudi Arabia Saudi Air Defense Intercepts Drone
मध्य पूर्वेतील आधीच पेटलेला संघर्ष आता अधिकच धोकादायक वळणावर पोहोचला आहे. सौदी अरेबिया आणि येमेनच्या हुथी बंडखोरांमधील लष्करी ताणतणाव तीव्र झाला असून, मुस्लिमांचे अत्यंत पवित्र शहर मानल्या जाणाऱ्या मक्कावर (Mecca Attack) ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, येमेनच्या बाजूने मक्का शहराच्या दिशेने येणारे एक स्फोटक ड्रोन वेळेत रोखून हवेतच नष्ट करण्यात आले.
सौदी लष्कराचे वक्तव्य आणि १५ सप्टेंबरची घटना सौदी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी या घटनेबाबत अधिकृत माहिती दिली. १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे ६:५० च्या सुमारास मक्का शहराच्या दक्षिण भागात एक अनोळखी ड्रोन घिरट्या घालताना आढळले. सौदी हवाई संरक्षण यंत्रणेने तात्काळ हालचाल करत मक्काच्या प्रतिबंधित आणि सुरक्षित हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच ते ड्रोन पाडले. सौदी प्रशासनाने या घटनेचे वर्णन मक्का शहराला लक्ष्य करण्याचा दुसरा मोठा प्रयत्न म्हणून केले आहे. याआधी २०१७ मध्येही हुथी बंडखोरांनी मक्काच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप सौदीने केला होता, जरी हुथींनी तो आरोप फेटाळला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Space Force : अंतराळात रंगणार तिसरे महायुद्ध? अमेरिकेकडून पृथ्वीच्या कक्षेत प्राणघातक शस्त्रास्त्रांची तैनाती; जगभरात खळबळ
मक्का, जेड्डा आणि ताईफ शहरांत सायरन अन् अलर्ट या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून सौदी नागरी संरक्षण दलाने मक्का, जेड्डा आणि ताईफ या तीन प्रमुख शहरांमध्ये आणीबाणीचा इशारा जारी केला. वर्तमान मध्य-पूर्व युद्ध सुरू झाल्यापासून मक्का शहरात अशा प्रकारचा धोक्याचा इशारा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रशासनाने नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे, शांतता राखण्याचे आणि उघड्या जागा, खिडक्या, बाल्कनी किंवा छतांवर न जाण्याचे आवाहन केले. काही वेळातच संपूर्ण परिसर सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर हा इशारा मागे घेण्यात आला.
BREAKING: First time in history. 🇸🇦Mecca, the holiest site for nearly 2 billion Muslims, just received its first-ever live emergency missile & Drone warning. Same alert hit Jeddah, Taif, Yanbu, Abha, Jazan and AlUla. This follows days of Houthi missile and drone attacks on… — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) September 15, 2026
credit – social media and Twitter
येमेनमधील युद्धाची भीषणता अन् विस्थापन मक्काजवळ घडलेली ही घटना येमेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाचाच एक भाग आहे. येमेनमध्ये हुथी बंडखोर आणि सौदी अरेबियाच्या पाठिंब्यावर लढणारे सरकारी सैन्य यांच्यातील संघर्ष अचानक अत्यंत तीव्र झाला आहे. ताज्या अहवालानुसार, या संघर्षात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धाच्या भयंकर सावटामुळे ९४,००० हून अधिक येमेनी नागरिकांना आपली घरे सोडून पलायन करावे लागले आहे. हजारो लोक सुरक्षिततेसाठी दक्षिण येमेनकडे जात आहेत, तर २,००० हून अधिक नागरिक समुद्रमार्गे जिबूती या देशात आश्रयाला गेले आहेत.
Breaking: #Saudi Air Defense intercepted and destroyed a drone that entered #Mecca‘s airspace. The Saudi-led military coalition in #Yemen says the “attempt to target Mecca with a drone will remain a black mark in the record of Houthi violations” and that the security of the holy… — Ahmed Quraishi (@_AhmedQuraishi) September 15, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Pipeline Shutdown : 90 मिनिटांत खेळ खल्लास! सौदीने केली मुख्य तेल पाइपलाइन बंद; आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड 107 डॉलर पार
जागतिक स्तरावर चिंतेचे सावट मक्कासारख्या जगभरातील कोट्यवधी मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक केंद्राजवळ लष्करी कारवाई आणि सायरन वाजण्याची घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेचे आवाहन केले जात आहे.