Saudi Arabia deported 4,700 Pakistani beggars says Defence Minister Asif
इस्लामाबाद: पाकिस्तानला पुन्हा एकदा अपमानाचा सामना करावा लागत आहे. या अपमानाला जबाबदार पाकिस्तानचेच नागरिक आहेत. पाकिस्तानने अनेक वेळा IMF आणि अरब देशांकडे मदत मागितली आहे. पण केवळ पाकिस्तान सरकारत नव्हे तर पाकिस्तानच्या नागरिकांनी देखील हातात वाठी परदेशात भीक मागण्याचा व्यवसाय केला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या नागरिकांवर कारवाई केली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पाकिस्तानमध्ये सुमारे २.२ कोटी भिकारी आहेत. ते दरवर्षी भिक मागून दरवर्षी सुमारे ४२ अब्ज रुपये गोळा करतात. तथापि, हे भिकारी पाकिस्तानपुरते मर्यादित नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमातून विदेशात जाऊन सुद्धा भीक मागत आहेत. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की होत असून अलिकडेच सौदी अरेबियाने ४,७०० हून अधिक पाकिस्तान भिकाऱ्यांना पकडले आणि त्यांना परत पाठवले आहे, ही माहिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी दिली. ते सियालकोट येथे रेडिमेड गार्मेंट्स मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्सपोर्टर्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
पाकिस्तानातील भिकारीही हे वेगवेगळ्या व्हिसावर सौदीला गेले होते आणि तिथे बेकायदेशीरपणे भीक मागत होते. सौदी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि हद्दपार केले. तथापि, हा आकडा कोणत्या कालावधीशी संबंधित आहे हे त्यांनी सांगितले नाही. ख्वाजा आसिफ म्हणाले की, परदेशात पाकिस्तानी भिकाऱ्यांची वाढती संख्या देशाची प्रतिमा खराब करत आहे.